जाहिरात

Nagpur News : काँग्रेसची 5 किमीची सद्भावना यात्रा 500 मीटरवर आटोपली; पक्षातील गटबाजीही चव्हाट्यावर

Congress Sadbhavana Yatra : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या यात्रेला अनुपस्थित राहिले. नागपूरचे माजी खासदार, माजी मंत्री विलास मुत्तेमवार हे देखील यात्रेत उपस्थित नव्हते.

Nagpur News : काँग्रेसची 5 किमीची सद्भावना यात्रा 500 मीटरवर आटोपली; पक्षातील गटबाजीही चव्हाट्यावर

प्रविण मुधोळकर, नागपूर

Nagpur News : काँग्रेसच्या सद्भावना रॅलीला तीव्र उन्हाचा आणि काँग्रेसच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसला आहे. नागपूरच्या भालदारपुरा ते राजवाडा हॉटेल असा रॅलीचा चार ते पाच किलोमीटर मार्ग ठरवण्यात आला होता. मात्र ही यात्रा अवघ्या अर्धा किलोमीटवरच संपवण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सद्भावना यात्रेची सुरुवात सकाळी 9.30 वाजता सुरु होणार होती. मात्र ही यात्रा प्रत्यक्षात 11.30 वाजता सुरुवात झाली. या उन्हाचा पारा वाढला होता. अशा वेळी यात्रा थोडक्यात उरकण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढावली. त्यानंतर राजवाडा पॅलेस हॉटेलमध्ये त्यानंतर काँग्रेसची सभा पार पडली. नागपूरमध्ये उसळलेली दंगल आणि कायदा सुव्यस्थेची स्थिती याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसची ही यात्रा काढण्यात आली होती. 

(नक्की वाचा-  Amravati Airport: 'अमरावतीचे माझ्यावर कर्ज, मी कायम कर्जात..', CM फडणवीस काय म्हणाले?)

काँग्रेसमधील गटबाजी उघड

काँग्रेसच्या सद्धभावना शांती यात्रेत पक्षातील अंतर्गत गटबाजी देखील पाहायला मिळाली. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या यात्रेला अनुपस्थित राहिले. नागपूरचे माजी खासदार, माजी मंत्री विलास मुत्तेमवार हे देखील यात्रेत उपस्थित नव्हते. त्यामुळे काँग्रेसने या यात्रेतून काय साध्य केलं असा सवाल राजकीत वर्तुलात चर्चिला जात आहे.

(नक्की वाचा-  Cabinet Meeting: यापुढे कोठडीत मृत्यू झाल्यास... राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय!)

मार्ग बदलला तरी विचार कायम- नितीन राऊत

काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी याबाबत म्हटलं की, काँग्रेसची सद्भावना शांती यात्रा ही शिवाजी महाराज चौक ते राजवाडा हॉटेल अशी एक किलोमीटर आयोजित करण्यात आली. आधी हा मार्ग नागपूरच्या भालदारपुरा ते राजवाडा हॉटेल असा चार ते पाच किलोमीटर मार्ग होता. मात्र पोलिसांनी हा नवा मार्ग दिला. 

आधी नागपूर पोलिसांनी सद्भावना यात्रेचा मार्ग शिवाजी महाराज पुतळा, नरसिंह टॉकीज, कोतवाली, बडकस चौक, चिटणीस पार्क, भालदार पुरा, राजवाडा पॅलेस हॅाटेल असा मार्ग दिला होता. पण काँग्रेसने दंगलग्रस्त भागातून सद्धभावना यात्रा काढू नये, असे पोलिसांनी सांगितले होते. मार्ग बदलला तरी विचार कायम राहिल, असं  नितीन राऊत यांनी म्हटलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: