जाहिरात

Corona Virus : कोरोना पुन्हा येतोय? 10 पैकी 2 संशयित दगावले, मृतांवर कोविड प्रोटोकॉलप्रमाणे अंत्यसंस्कार

मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये कोविडसदृश्य लक्षण असणाऱ्या दहा रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी दोन रुग्ण दगावले आहेत.

Corona Virus : कोरोना पुन्हा येतोय? 10 पैकी 2 संशयित दगावले, मृतांवर कोविड प्रोटोकॉलप्रमाणे अंत्यसंस्कार

हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशात मुंबईत कोरोना संशयित दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे. भारतासह जगभरात कोरोनाच्या अत्यंत वेदनादायी आठवणी आहेत. कोरोनामध्ये अनेकांनी आपल्या जिवलगांना गमावलं. त्यामुळे कोरोना सदृश्य रुग्ण आढळल्याने मुंबईकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

मुंबईतील रुग्णांमध्ये कोविड सदृश्य लक्षणे आढळण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये कोविडसदृश्य लक्षण असणाऱ्या दहा रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी दोन रुग्ण दगावले आहेत. विशेष म्हणजे मृत रुग्णांवर कोविड प्रोटोकॉल प्रमाणेच अंत्यसंस्कार करण्यात आले. या रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे झाला हे स्पष्ट नसलं तरीही खबरदारी म्हणून रुग्णालय प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोरोनाची लक्षणं असणाऱ्या उर्वरित आठ रुग्णांना सेव्हन हिल रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रुग्णालय व्यवस्थापनाकडून या रुग्णांकडे अधिक लक्ष दिलं जात आहे. पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढू नये यासाठी अधिक काळजी घेतली जात आहे. 

Nalasopara Crime : भिंतींमध्ये 45 लाखांची रोकड, ED च्या धाडीत बांधकाम माफियाचा प्रताप; अधिकारीही चक्रावले

नक्की वाचा - Nalasopara Crime : भिंतींमध्ये 45 लाखांची रोकड, ED च्या धाडीत बांधकाम माफियाचा प्रताप; अधिकारीही चक्रावले

केईएम रुग्णालयात रविवारी सकाळी 58 वर्षीय एका महिलेचा तर 13 वर्षीय मुलीचा संशयित कोरोनाने मृत्यू झाला असल्याचे उघडकीस आले आहेत. 58 वर्षीय महिलेला 14 मे रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला असल्याने त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

घाबरण्याची गरज नाही- आरोग्य विभाग

मुंबई महापालिका आणि आरोग्य विभागाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. जेणेकरून सुरुवातीच्या टप्प्यातच संसर्ग थांबवता येईल. गरज पडल्यास कठोर कारवाई करण्याची तयारीही विभागाने केली आहे. सध्या घाबरण्याची गरज नाही असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र निष्काळजीपणा करू नये विशेष करुन वृद्ध, गंभीर आजारांनी ग्रस्त असलेले लोक आणि परदेशातून परतणाऱ्या प्रवाशांनी काळजी घ्यावी.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com