Corona Update : महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असल्याची चिंताजनक परिस्थिती आहे. नवीन ओमिक्रॉन उपप्रकाराच्या प्रसारामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. बुधवारी 4 जून रोजी ठाण्यात कोविड-19 चे 4 नवीन रुग्ण आढळले. ज्यामुळे ठाण्यातील कोरोना बाधितांची संख्या 130 झाली आहे. सध्या 12 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे. याव्यतिरिक्त, 25 रुग्ण होम क्वारंटाइनमध्ये आहेत, असे ठाणे महापालिकेने म्हटले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्रातील कोरोनाची सद्यस्थिती
महाराष्ट्रात मागील 24 तासात महाराष्ट्रात 16 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 76 वर्षांचे दोन पुरुष आणि 79 वर्षांची एक महिला यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण आधीच गंभीर आजाराने ग्रस्त होते. महाराष्ट्रात सध्या 526 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात (17), केरळमध्ये (9) आणि दिल्लीमध्ये (7) सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.
(नक्की वाचा- Pune Corona update : पुण्यात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमध्ये आढळला कोरोना व्हायरस, तज्ज्ञांचा इशारा )
देशभरातील आकडेवारी
देशात गेल्या 24 तासांत कोविडचे 564 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या 4866 वर पोहोचली आहे. केरळमध्ये 114, कर्नाटकमध्ये 112, पश्चिम बंगालमध्ये 106, दिल्लीमध्ये 105, गुजरातमध्ये 47, राजस्थानमध्ये 13, महाराष्ट्रात 16, आंध्र प्रदेशात 19, हरियाणामध्ये 12 नवीन रुग्ण आढळले
नक्की वाचा- देशभरात कोरोनाचे 4,300 हून अधिक रुग्ण, चौथ्या लाटेची चर्चा; मात्र आकडे काय सांगतात?)
तर मागील 24 तासांत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 51 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 674 कोविड रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशभरात आतापर्यंत एकूण 3955 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.