
निनाद करमरकर, उल्हासनगर
पाण्याने भरलेला फुगा अंगावर मारल्याच्या रागातून तुफान राडा झाला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील गणेश नगरमध्ये ही घटना घडली आहे. यात 7 ते 8 जणांच्या टोळीने थेट दुकानात घुसून दोन जणांना बेदम मारहाण केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या हल्ल्यात इर्शाद अली आणि अब्दुल हकीम हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इर्शाद अली याचा गणेश नगरमध्ये जीन्स कारखाना असून याठिकाणी रस्त्यावर काही अल्पवयीन मुलं फुगे मारत होते.
(वाचा- Best bus fare hike : बेस्ट बसच्या दरात दुप्पट वाढ? सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार)
या वादातून या दोघांचा त्यांच्याशी वाद झाला आणि या टोळक्याने थेट दुकानात घुसून इर्शाद आणि अब्दुल हकीमवर हल्ला चढवत त्यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी सध्या हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world