Salman Khan Maatrubhumi Movie: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान मागील काही दिवसांपासून त्याचा बहुप्रतीक्षित 'मातृभूमी' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्तही काही दिवसांपूर्वी समोर आले होते. पण आता सिनेमाचे प्रदर्शन अनिश्चित काळासाठी रोखण्यात आले आहे, असे म्हटले जात आहे. NDTV ला मिळालेल्या माहितीनुसार, गलवान संघर्षावरून प्रेरित असलेल्या 'मातृभूमी' सिनेमाचं प्रदर्शन CBFCने म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने अनिश्चित काळासाठी रोखले आहे. आधी या सिनेमाचे नाव 'बॅटल ऑफ गलवान' ठेवण्यात आले होते, त्यानंतर ते बदलून 'मातृभूमी' असे करण्यात आले होते.
सीबीएफसी (CBFC) कडून मंजुरीची प्रतीक्षा
माहितीनुसार गलवान संघर्षावर आधारित सलमान खानच्या सिनेमाचं प्रदर्शन CBFC म्हणजेच 'सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन'ने पुढील आदेशापर्यंत रोखले आहे. सिनेमाचे नाव बदलून 'मातृभूमी' करण्यात आले आणि ही एक काल्पनिक कथा असल्याचं डिस्क्लेमर देखील देण्यात आलं होतं, तरीही CBFCने सिनेमाला मंजुरी दिलेली नाही. यामुळे सिनेमाची रिलीज डेट रखडली आहे.
(नक्की वाचा: लेकानं मुस्लीम हीरोइनशी लग्न करण्यावर दारा सिंग यांचं काय म्हणणं होतं? विंदू दारा सिंगचा खळबळजनक खुलासा)
'मातृभूमी'ची कथा | Maatrubhumi Movie 2026
सलमान खानच्या 'मातृभूमी' सिनेमाची कथा भारत आणि चीन देशादरम्यान झालेल्या गलवान खोऱ्यातील घटनेवर प्रेरित असल्याचे सांगितले जात आहे. हा सिनेमा वर्ष 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन संघर्षावर आधारित एक ऐतिहासिक वॉर ड्रामा (युद्धपट) सिनेमा असल्याचे म्हटलं जातं. सिनेमाचे नाव आधी 'बॅटल ऑफ गलवान' होते, पण काही कारणास्तव निर्मात्यांनी सिनेमाचे नाव बदलून 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' (Matrubhoomi: May War Rest in Peace) असे ठेवले आहे.
(नक्की वाचा: Jason Sanjay: थलपती विजय यांचा फॅन अन् मुलाला केलं किडनॅप! त्या व्हायरल व्हिडीओने सोशल मीडियावर उडवली खळबळ)
'मातृभूमी' सिनेमाबाबत माहिती
आधी 'मातृभूमी' सिनेमा 17 एप्रिल 2026 रोजी रिलीज होणार होता, पण संरक्षण मंत्रालय आणि सेन्सॉर बोर्डाचे आक्षेप तसेच काही सीन रीशूटमुळे सिनेमाच्या प्रदर्शनाला उशीर झाला आहे. आता हा सिनेमा 14 ऑगस्ट रोजी बॉक्सऑफिसवर रिलीज होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. या सिनेमात सलमान खान कर्नल संतोष बाबू यांच्या भूमिकेत दिसणार आहे, जे 16 बिहार रेजिमेंटचे नेतृत्व करत 'लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल'वर (LAC) परिस्थिती हाताळतात. सलमान खानसोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अभिनेता अभिलाष चौधरी आणि अंकुर भाटिया हे देखील महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world