Farmer News : राज्य सरकारचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धक्का; भरपाईसाठी जमिनीची कमाल मर्यादा घटवली

राज्य मंत्रिमंडळाच्या 27 मेच्या बैठकीत 27 मार्च 2023 च्या निर्णयानुसार मदतीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे 27 मार्च 2023 च्य निर्णयाचा विचार केल्यास दोन हेक्टरपर्यंतच मदत देत येणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

लाडकी बहीण योजनेचा फटका अनेक विभागांना बसल्याचं आधीच समोर आलं आहे. लाडकी बहीण योजनेमुळे वेगवेगळ्या विभागांचे निधीचे पैसे वळवले जात आहे. आता अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पुराने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानभरपाईच्या रकमेत राज्य सरकारने कपात केली आहे. तसेच, कमाल तीन हेक्टरऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मदत देण्याचा निर्णयही घेतला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्य मंत्रिमंडळाच्या 27 मेच्या बैठकीत 27 मार्च 2023 च्या निर्णयानुसार मदतीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे 27 मार्च 2023 च्य निर्णयाचा विचार केल्यास दोन हेक्टरपर्यंतच मदत देत येणार आहे. विशेष म्हणजे  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने 1 जानेवारी 2024 रोजी एक जीआर काढला होता आणि मदतीचे दर आणि हेक्टरची कमाल मर्यादा यात वाढ केली होती. पण तो निर्णय रद्द करून आता पुन्हा 27 मार्च 2023 च्या निर्णयानुसार मदत केली जाणार असल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. 

(नक्की वाचा-  Akola Crime: कृषी अधिकाऱ्यांची मोठी कारवाई! लाखो रुपयांचे बोगस बियाणे जप्त)

राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतातील उभी पिकं आडवी झाली आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून काही मदतीची अपेक्षा आहे. सरकारकडून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे देखील सुरु झाले आहेत. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येणार आहे. 

२७ मार्च २०२३ चा शासन निर्णय

जिरायत पिकांचे नुकसान 
प्रति हेक्टर ८,५०० प्रति हेक्टर, 
२ हेक्टरच्या मर्यादेत

बागायत पिकांचे नुकसान
१७,००० रु. प्रति हेक्टर, 
२ हेक्टरच्या मर्यादेत

बहुवार्षिक पिकांचे नुकसान
२२,५०० रु. प्रति हेक्टर, 
२ हेक्टरच्या मर्यादेत

( नक्की वाचा :  Honey Trap : 'ती'ने फेसबुकवर अंगप्रदर्शन केले, 'त्याने' पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवली! ठाण्याचा रवी असा सापडला जाळ्यात )

Advertisement

१ जाने २०२४ पासूनचा शासन निर्णय

जिरायत पिकांचे नुकसान
१३,६०० प्रति हेक्टर 
३ हेक्टरच्या मर्यादेत

बागायत पिकांचे नुकसान
२७,००० रु. प्रति हेक्टर, 
३ हेक्टरच्या मर्यादेत

बहुवार्षिक पिकांचे नुकसान
३६,००० रु. प्रति हेक्टर, 
३ हेक्टरच्या मर्यादेत

Topics mentioned in this article