मेहबूब जमादार, रायगड
मुंबई-गोवा महामार्गाचे नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठेकेदार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेश कुमार सिंह यांच्यावर गुन्हा दाखल तर प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे यांना अटक करण्यात आली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इंदापूर ते वडपाले या 26.7 किमी अंतराचा महामार्गाचे चौपदीकरणाचे काम केंद्र शासनाकडून मागवण्यात आलेल्या निविदांद्वारे चेतक इंटरप्राईजेस लिमिटेड आणि अॅपको इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीचे संयुक्त उपक्रमास ठेकेदार याचेकडून सदर काम दोन वर्षाच्या कालावधीत पूर्ण करावयाचे होते. सदर कालावधी संपल्यानंतरही मुदत वाढ मिळूनही ठेकेदार यांचेकडून सदर मुदत वाढ कालावधीत सदरचे कामे खूप कमी गतीने करण्यात आली.
वारंवार कारणे दाखवा नोटीस, निकृष्ट दर्जाचे काम, गुणवत्ता नियंत्रणावर देखरेख करण्यासाठी नियुक्त केलेल्या ब्लूमएलएलसी, यूएसए, शाखा महाड यांच्या मार्फतीने एनसीआर (Non Confirmation Reports) देण्यात आलेले आहेत. परंतु नमूद कंत्राटदार यांच्या कामामध्ये काही सुधारणा झाल्याचे दिसून आले नाही.
(नक्की वाचा - अकोला हादरलं! पोटच्या लेकीवर बापाचा अत्याचार, मामानंही सोडलं नाही)
महामार्गाच्या एकाच लेनवरुन जाणारी व येणारी वाहने, वाहन चालकांना धोकादायक स्थितीमध्ये चालविणे भाग पडत होते. ज्या ठिकाणी काम पुर्ण झालेले नाही त्या ठिकाणी रस्त्याचा भाग उखडून जागोजागी खड्डे पडलेले आहेत. तर काही ठिकाणी नव्याने करण्यात आलेला रस्ता आणि जुना रस्ता यामधील काही भाग खोदून ठेवून ते काम पूर्ण न करता तो तसाच अपुर्ण ठेवून दिलेला आहे.
प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणताही धोका निर्माण होऊ नये याकरिता कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा उपाययोजना केलेल्या नाहीत. महामार्गावर वारंवार मोटार अपघात होऊन अशा मोटार अपघातांमध्ये अनेक प्रवाशांची जीवितहानी झालेली असून अनेक प्रवासी हे गंभीर तसेच किरकोळ दुखातपग्रस्त झालेले आहेत.
(नक्की वाचा- - पती पत्नी अन् जादूटोणा? नदीच्या संगमाजवळ दोघांचे मृतदेह, हैराण करणार हत्याकांड)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर 2020 पासून आजपर्यंत 170 मोटार अपघात झाले असून यात एकूण 97 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 208 प्रवाशांना गंभीर व किरकोळ स्वरुपाच्या दुखापत झाल्या आहेत. याशिवाय अपघातग्रस्त वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहेत. यासाठी चेतक एंटरप्रायझेस लिमिटेड (मे. चेतक ऍपको (जेव्ही) ही कंपनी कारणीभूत आहेत.
यामुळेच चेतक एंटरप्रायझेस लिमीटेड (मे. चेतक अॅप्को (जेव्ही) कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेश कुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे व नमूद प्रकल्पावर काम करणारे कंपनीच्या इतर जबाबदार व्यक्ती यांच्या विरुद्ध प्रकल्प अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांचे तक्रारीवरुन माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कलम 105, 125 (अ) (ब) व 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे यांना अटक करण्यात आलेली आहे. पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world