
Mumbai News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाला अधिवेशनात जागा नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण विधानभवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दालन असले तरी, कार्यालय मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कुठेच दिसत नाही, अशी बाब उघड झाली आहे.
तळमजल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दालन असून त्यासमोर त्यांच्या प्रधान सचिवांचे कक्ष आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या स्टाफसाठी जे दालन पहिल्या मजल्यावर होते ते आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या ताब्यात आहे. मागील अधिवेशनात शिंदेंच्या स्टाफला तात्पुरत्या स्वरूपात ही जागा वापरण्यास दिली होती.
(नक्की वाचा- Chief Secretary Rajesh Kumar : मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेले राजेश कुमार कोण आहेत? वाचा 36 वर्षांची कारकीर्द)
आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पीएस, ओएसडी, जनसंपर्क अधिकारी, सहसचिव, उपसचिव यांना बसायला जागाच नाही. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्वांनी मंत्रालयात जाऊन कामकाज करावे लागले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्याकडे पत्राद्वारे त्यांच्या स्टाफसाठी स्वतंत्र दालनाची मागणी केली होती, मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.
( नक्की वाचा : CM on Thackeray : 'उद्धव - राज ठाकरेंनी एकत्र यावं, आणि...' मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं )
शिंदे यांच्या दालनासमोरील तीन कक्ष त्यांना मिळण्याची शक्यता होती. पण ती आता उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे गेली असून त्यांनी ती दालने सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शिंदे यांच्या कार्यालयाच्या कामकाजावर गोंधळाची छाया आहे. तेथे साधी Xerox काढण्याचीही सोय नसल्याचे सांगण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world