जाहिरात

Dharavi Health Drive: अदाणी नवभारत डेव्हलपर्स आणि DSM च्या वतीने मोफत आरोग्य शिबीर, नागरिकांचा उदंड प्रतिसाद

धारावीकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अदाणी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (ANDPL) आणि धारावी सोशल मिशन (DSM) यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Dharavi Health Drive: अदाणी नवभारत डेव्हलपर्स आणि DSM च्या वतीने मोफत आरोग्य शिबीर, नागरिकांचा उदंड प्रतिसाद

अदाणी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (एएनडीपीएल) आणि धारावी सोशल मिशन (डीएसएम) यांच्या वतीने धारावीकरांसाठी दोन दिवसीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धारावी रिसोर्स सेंटर (डीआरसी) येथे 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरात, तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत समुपदेशन आणि विविध प्रकारच्या आरोग्य चाचण्यांची सुविधा धारावीकरांना उपलब्ध करून देण्यात आली. 

सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी, एनएनडीपीएल आणि डीएसएमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला स्थानिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. 600 हून अधिक धारावीकरांनी आरोग्यसेवांचा लाभ घेतला. यावेळी पुनर्विकासातून वगळण्यात आलेल्या भूखंडावरील (एक्सक्लुडेड पार्सल) रहिवाशांना शिबिराचा लाभ मिळवून देण्यावर विशेष भर देण्यात आला. 

कर्करोग तपासणीची सुविधा

नियमित आरोग्य तपासणी, महिला व बालकांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन, नेत्र तपासणी अशा विविध आरोग्यसेवांचा लाभ या शिबिराच्या माध्यमातून स्थानिकांनी घेतला. तसेच, तोंडाच्या, स्तनाच्या आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोग निदानासाठी केल्या जाणाऱ्या तपासणीची सुविधादेखील येथे उपलब्ध करण्यात आली होती. याशिवाय, रक्तक्षय (अनेमिया), मधुमेह, लठ्ठपणा, लहान मुलांमधील कुपोषण यांचे निदान करणाऱ्या तपासण्याही शिबिरात करण्यात आल्या.

Dharavi Health Mission

विविध आजारांचे निदान लवकरात लवकर करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीबाबत स्थानिक रहिवाशांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि त्यांना योग्य वेळेत उपचार घेण्याचे महत्त्व पटवून देणे, हा शिबिर आयोजनामागचा मुख्य हेतू होता. 

या शिबिराला, सर्वच वयोगटातील रहिवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला. आसपासच्या परिसरातील प्राथमिक आरोग्यसेवेची आवश्यकता यातून अधोरेखित झाली. या शिबिरात, तज्ज्ञ डॉक्टरांनी विविध तपासण्या करून रहिवाशांच्या आरोग्यविषयक शंकांचे समाधान केले. तसेच, निरोगी जीवनशैली आणि नियमित आरोग्य तपासणीबाबत मार्गदर्शनही केले.

धारावीकरांच्या सक्षमीकरणासाठी भविष्यातही विविध उपक्रम राबवणार

शाश्वत विकास साधताना आरोग्यविषयक सुविधा केंद्रस्थानी असायला हव्यात, असे मत एएनडीपीएल आणि डीएसएमच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केले. ‘‘धारावीकरांना त्यांच्या घराजवळच दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देतानाच, नियमित आरोग्य तपासणीबाबत इथल्या रहिवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आम्हालाही बळ मिळाले आहे. खऱ्या अर्थाने धारावीकरांचे सक्षमीकरण करण्यासाठी भविष्यातही असे विविध उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे'', अशी प्रतिक्रिया प्रवक्त्यांनी दिली.

अनेकविध आरोग्यसुविधा घराजवळच उपलब्ध झाल्यामुळे रहिवाशांनी शिबिराबाबत समाधानाची भावना व्यक्त केली. ‘‘गेल्या काही दिवसांपासून मी ज्या आरोग्य तपासण्या करण्यासाठी टाळाटाळ करत होतो, त्याच तपासण्या मला या शिबिरात करून घेता आल्या. तपासणीच्या निदानाबाबत डॉक्टरांनी सोप्या शब्दांत समजावून सांगितले आणि पुढच्या उपचाराबाबत सविस्तर समुपदेशन केले. स्थानिक रहिवाशांसाठी हे शिबिर फारच उपयुक्त ठरले" अशी भावना एका लाभार्थ्याने व्यक्त केली.

Latest and Breaking News on NDTV

‘‘विविध तज्ज्ञ डॉक्टर एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला. येथील नियोजन उत्तम होते. मी याच शिबिरात नेत्रतपासणी आणि संपूर्ण आरोग्य तपासणीदेखील करून घेतली'', अशा शब्दांत आणखी एका लाभार्थ्याने समाधान व्यक्त केले.

ज्येष्ठ नागरिक आणि दैनंदिन कामात व्यग्र असणाऱ्या कुटुंबातील इतर सदस्यांना आरोग्य तपासण्या करण्यासाठी वेगळा वेळ काढणे बऱ्याचदा शक्य होत नाही. अशा लोकांना या शिबिरामुळे मोठा दिलासा मिळाला, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नागरिकाने व्यक्त केली.

हे दोन दिवसीय आरोग्य शिबिर हा एएनडीपीएल आणि धारावी सोशल मिशन (डीएसएम) यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या व्यापक सामाजिक उपक्रमांचा एक भाग आहे, यातून धारावीकरांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणे आणि त्यांच्यापर्यंत सुधारित आरोग्य सुविधा पोहोचवणे ही उद्दिष्टे साधली जातात. समुदाय सहभाग व संवाद वाढवण्यासाठी आणि स्थानिकांच्या कल्याणासाठी असे आणखी उपक्रम राबवण्याविषयीची वचनबद्धता या दोन्ही संघटनांनी यावेळी अधोरेखित केली. 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com