जाहिरात

धारावीकरांना मिळाला तणावमुक्तीचा मंत्र, डीएसएमच्या विशेष कार्यशाळेत गिरवले धडे

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्षमय जीवन जगणाऱ्या धारावीकरांना तणावमुक्तीचा मंत्र मिळाला असून आता त्यांनी 'टेन्शन फ्री' आयुष्य जगण्याचा संकल्प केला आहे.

धारावीकरांना मिळाला तणावमुक्तीचा मंत्र, डीएसएमच्या विशेष कार्यशाळेत गिरवले धडे
प्रतिकात्मक फोटो
मुंबई:

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्षमय जीवन जगणाऱ्या धारावीकरांना तणावमुक्तीचा मंत्र मिळाला असून आता त्यांनी 'टेन्शन फ्री' आयुष्य जगण्याचा संकल्प केला आहे. धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल)चा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या धारावी सोशल मिशन (डिएसएम)च्या वतीने ने धारावीतील निसर्ग उद्यानात तणाव व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेतून धारावीकरांना आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

डीएसएमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, एकमेकांच्या सहभागाने ताण दूर करणारी प्रात्यक्षिके आणि उत्तम मानसिक आरोग्यासाठी विविध तंत्रे अशा सर्वसमावेशक तणाव व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन  करण्यात आले होते. या कार्यशाळेत शेकडो धारावीकरांनी तणाव व्यवस्थापनाचे धडे गिरवले असून चिंतामुक्त आयुष्याच्या दिशेने प्रत्यक्ष वाटचालीला सुरुवात केली आहे.

ही कार्यशाळा अनेकांसाठी नवसंजीवनी ठरली. "दीर्घ श्वासोच्छ्वास आणि मानसिक  सजगता या मला कार्यशाळेतून नव्याने कळल्या. मी दररोज थोडा वेळ काढून या गोष्टींचा सराव सुरू केला असून यातून माझ्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडण्यासाठी नक्कीच मदत होईल, याची मला खात्री आहे' अशी प्रतिक्रिया 45 वर्षीय संगीता मनोहर खाडे यांनी दिली.

( नक्की वाचा : धारावीकरांच्या मनातील संभ्रम होणार दूर, 'या' नंबरवर कॉल करा आणि विचारा प्रश्न )
 

वास्तविक, धारावीकरांना संघर्ष काही नवा नाही. आशियातील सगळ्यात जास्त दा वस्तीत राहताना धारावीकर रोजच आर्थिक, सामाजिक आणि मानसिक आव्हानांचा सामना करत आहेत. या सततच्या आव्हानांसह संघर्षमय आयुष्य जगताना अनेकदा हा मानसिक ताण कायम दुर्लक्षित राहतो. 

दैनंदिन जीवनातल्या संघर्षापुढे मानसिक आरोग्याला नेहमीच दुय्यम स्थान देणाऱ्या धारावीकरांसाठी मानसिक आरोग्याबाबत जागरूकता, ही संकल्पनाच नवी होती.

"मेडिटेशन करताना मला आपोआपच रडू आले. त्यानंतर मनावरचा ताण एकदम हलका झाला. या कार्यशाळेने मला जगण्याची नवी दृष्टी दिली. दिवसभरातून 5 मिनिटांसाठी का होईना, स्वतःसाठी वेळ काढून शांतपणे बसणे आणि त्या विधात्याचे आभार मानणे, हे स्वत:च्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, याची जाणीव मला या कार्यशाळेने करून दिली "अशा शब्दात पीएमजीपी कॉलनी येथे राहणाऱ्या 45 वर्षीय सीमा पाखरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

( नक्की वाचा : धारावीतील सर्वेक्षणासाठी ड्रोन, लायडार, डिजिटल साधनांचा वापर; अचूकता, पारदर्शकतेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल )
 

धारावी सोशल मिशन काय आहे?

धारावीच्या सर्वांगीण विकासासाठी धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) च्या वतीने धारावी सोशल मिशन (डिएसएम) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमातून धारावीतील पायाभूत सुविधांच्या बदलाबरोबरच धारावीकरांच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. धारावीकरांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच शाश्वत उपजीविका आणि सर्वसमावेशक विकासासाठी या उपक्रमातून पुढाकार घेतला जातो.

महिला आणि युवकांचे सशक्तिकरण, औद्योगिक विकास आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील असलेल्या उपेक्षित घटकांना सहाय्य ही तीन महत्त्वाची उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी डिएसएम सदैव कार्यरत आहे. यासाठी कौशल्य विकास, रोजगार निर्मिती, समाज कल्याण, सामाजिक बांधिलकी अशा विविध पातळ्यांवर काम केले जात आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com