नागपूर: विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपताच नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर अज्ञातांनी दगडफेक केलीय. या दगडफेकीमध्ये देशमुख जखमी झाले आहेत, अशी माहिती आहे. काटोलमध्ये हा हल्ला झाल्याची माहिती आहे.
या हल्ल्यात देशमुख यांच्या डोक्याला जबर मार लागल्याची माहिती असून ते रक्तबंबाळ झाले आहेत. विधानसभा निवडणुकांचा प्रचार संपताच काही तासांमध्येच ही घटना उघडकीस आल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. काटोल विधानसभा मतदारसंघातील बेलफाटाजवळ ही घटना घडली आहे. देशमुख सभेवरुन परतत असताना त्यांच्या कारवर दगडफेक झाली. देशमुख यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
विरोधी पक्षांनी या मुद्यावर सरकारवर जोरदार टीका केली आहे. हा हल्ला करणारे भाजपाचे कार्यकर्ते असल्याचा दावा देशमुखांनी केलाय. तर ही देशमुखांची स्टंबाजी आहे, असं उत्तर भाजपानं केलाय. भाजपा कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप पक्षानं फेटाळला आहे.
नक्की वाचा: 'बारामती म्हटलं की देशात कुणाचं नाव घेतात? सांगता सभेत शरद पवार काय-काय बोलले?
शरद पवार संतापले
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात सरकारनं ठोस पावलं उचलावी, अन्यथा संघर्षाची भूमिका घेणार अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'NDTV मराठी' ला बोलताना दिली आहे. अनिल देशमुख हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी गृहमंत्री म्हणून राज्याचा कारभार सांभाळला आहे. अशा सुसंस्कृत व्यक्तींवर हल्ला होणे निषेधार्थ आहे. याबाबत अधिकृत माहिती आल्यानंतर आम्ही भूमिका घेऊ असं ते म्हणालेत.
देवेंद्र फडणवीसांना इशारा
तसेच या प्रकरणी शरद पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही थेट आरोप केलेत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे सहकारी देशमुख यांच्यात वादावादी होत होती. देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांच्या लोकांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. व्यक्तीगत हल्ले करणे यांची मजल गेली आहे. या हल्ल्याचा निषेध करतो आणि राज्याच्या गृृहमंत्र्यांनी याबाबत लक्ष दिले नाही तर संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल. असा इशारा शरद पवारांनी दिला आहे.
महत्वाची बातमी: बाबा सिद्दीकी हत्येचा मास्टरमाईंड अनमोल बिश्नोईला अटक; अमेरिकेत मुसक्या आवळल्या
पाहा संपूर्ण व्हिडीओ
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world