अमजद खान, कल्याण
तरुणीची छेड काढण्यावरुन दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरात घडली आहे. एका तरुणीची दोन तरुणांनी छेड काढली. त्यानंतर तिला स्वत:चे मोबाईल नंबर देखील दिले. तरुणीच्या नातेवाईकांनी तरुणांना जाब विचारण्याकरता त्यांच्या घरी गेले. या दरम्यान दोन्ही गटात जोरदार राडा झाला.
डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हा दाखल करत पाच जणांना अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. या घटनेमुळे कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून त्याठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे.
(नक्की वाचा- सावत्र आईचं क्रूर कृत्य, अंथरुणात सू केली म्हणून 5 वर्षांच्या लेकीला उलथन्याने शरीरभर चटके! )
कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरात राहणाऱ्या जाकिर शेख आणि अरहम सय्यद या दोन तरुणांवर आरोप आहे की, त्यांनी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीची नेहमी छेड काढतात. इतकेच नाही तर या दोघांनी मुलीकडे त्यांचा मोबाईल नंबरही दिला होता. मुलीच्या घरातील लोकांना ही बाब लक्षात येताच तरुणीचे नातेवाईक अरहम सय्यद याच्या जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी गेले.
या दरम्यान तरुणीचे नातेवाईक आणि तरुणाच्या नातेवाईकांमध्ये जोरदार वाद झाला. वादाचे रुपांतरण हाणामारीत झाले. याची माहिती टिळकनगर पोलिसाना मिळताच दहा मिनिटात पोलीस त्याठिकाणी पोहचले. पोलिसांनी परिस्थिती शांत केली. परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
(नक्की वाचा- 10 वर्षांनी पाळणा हलला, बारसं करून पुण्याला जाताना कुटुंब संपलं; ड्रिंक अँड ड्राइव्हमुळे 4 हकनाक बळी!)
या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांनी सांगितले की, या प्रकरणात दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी जाकीर शेख, अरहम सय्यद यांना अटक केली आहे. तर दुसऱ्या गटातील सचिन राठोड, चेतन राठोड आणि राहूल राठोड या तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणीतील अन्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. संबंधितांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world