अमजद खान, प्रतिनिधी
डोंबिवली-डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिर संस्थानाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे शताब्दी वर्ष आहे. संस्थानाला मागच्या वर्षीच 100 वर्षे पूर्ण झाली. यंदा संस्थाच्या गणेशोत्सव मंडळाचे शताब्दी वर्ष असल्याने कोकणातील दशावताराचा भव्य देखावा साकारण्यात येणार आहे. तसेच अयोध्येतील राममंदिराच्या धर्तीवर भव्य मंदिराची प्रतिक्रिया उभारली जाणारआहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने देखाव्याची आरास आणि रोषणाई केली जाणार आहे , अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष राहूल दामले यानी दिली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डोंबिवलीकरांचे श्रद्धास्थान गणेश मंदिर संस्थान आहे. त्यामुळे डोंबिवली शहराची खरी ओळख आहे.गणेश मंदिर संस्थानाने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात 1925 साली केली. त्यावेळी संस्थानाच्या मंदिराला दान धर्मापाेटी मिळणारी मदत ही अत्यल्प होती. त्यामुळे मंडळाच्या गणेशोत्सवात त्यावेळी दान धर्मापोटी जास्त मदत मिळत होती. त्यातून मंदिराचे काम हळूहळू उभे केले गेले. मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. आत्ता मंदिराचे रुपडे पूर्णपणे पालटले आहे.
मंदिराने अनेक उपक्रम टप्प्या टप्प्याने सुरु केले. नव वर्ष स्वागत यात्रेचा उपक्रम हा मंदिर संस्थानाचा पुढाकारातून सुरु झाला. तो साता समुद्रापार पोहचला आहे. अध्यात्मिक कार्यातून सामाजिक बांधिलकी जोपण्याचे काम मंदिर संस्थान करते. तोच उद्देश मंदीर संस्थानाने सुरु करण्यात आलेल्या गणेशोत्सवातून साध्य केला जात आहे. मंडळाने रक्तदान शिबीरे आयोजित केली आहे. गरजूना मदतीचा हात दिला आहे. दुष्काळ ग्रस्त आणि पस्परिस्थितीत अन्नदान्य आणि औषधे पोहचविण्यात आली आहेत. डोंबिवलीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी मंडळाने घेतली होती.
मंडळाने आयोजित केलेले कार्यक्रम भारत रत्न भीमसेन जोशी, प्र. के. अत्रे, पं. ह्रदयनाथ मंगेशकर, पं. जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, अरुण म्हात्रे, पद्मजा फेणानी, विसूभाऊ बापट, शिरीष कणेकर यांनी गाजविलेले आहेत.
( नक्की वाचा : पुणेकरांनो, गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीमध्ये मोठा बदल! बाहेर पडण्यापूर्वी हे वाचा )
यंदा कोणता देखावा?
यंदाचा देखावा हा कोकणातील दशावतारावर आधारीत आहे. विष्णूने दृष्टांचा नायनाट केला. त्याच धर्तीवर हा देखावा आहे. गणेशोत्सव मंडळात तरुण कार्यकर्ते कार्यरत असतात. ते गणेशोत्सवाचे काम पाहतात. त्यातून चांगले कार्यकर्ते पुढे घडले जातात, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष दामले यांनी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world