जाहिरात

पुणेकरांनो, गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीमध्ये मोठा बदल! बाहेर पडण्यापूर्वी हे वाचा

Ganeshotsav 2024 Pune traffic changes : गणेशोत्सवानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल  करण्यात आले आहेत.

पुणेकरांनो, गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीमध्ये मोठा बदल! बाहेर पडण्यापूर्वी हे वाचा
प्रतिकात्मक फोटो
पुणे:

रेवती हिंगवे, प्रतिनिधी

गणेशोत्सवानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल  करण्यात आले आहेत.शहरातील अनेक मुख्य रस्ते उत्सवादरम्यान वाहुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. गणेशोत्सवादरम्यान शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहेत बदल?

गणेशोत्सव काळात येत्या 10 दिवसांमध्ये शहरातील एकूण 16   रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. शहरातील 12 रस्त्यांवर जड वाहनांना गणेशोत्सवा दरम्यान पूर्णपणे बंदी असणार आहे..गणेशोत्सवाच्या काळात शहरातील रस्ते संध्याकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने पीएमपीच्या 66 मार्गातही बदल करण्यात आले आहेत.

वाहतूक पोलिसांकडून शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते बस तसेच अन्य वाहतुकीसाठी सायंकाळी पाच नंतर बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.. विद्यार्थी, नोकरदार, कामगार, भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पीएमपीकडून मार्गातील संचलनात बदल करण्याच्या निर्णय PMPL प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

Ganesh Chaturthi 2024 : गणपतीला मोदकांचाच नैवेद्य का अर्पण करतात?

( नक्की वाचा : Ganesh Chaturthi 2024 : गणपतीला मोदकांचाच नैवेद्य का अर्पण करतात? )

गणेशोत्सवाच्या दरम्यान पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात देखील मोठे बदल करण्यात आले असुन प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे मेट्रोच्या गणेशोत्सवादरम्यान जादा फेऱ्या करण्याचा निर्णय मेट्रोने घेतला आहे.

कोणत्या 12 रस्त्यांवर जड वाहनांना बंदी ?

शास्त्री रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड, केळकर रोड, बाजीराव रोड, शिवजी रोड, कर्वे रोड,FC कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, सिंहगड रोड, गणेश रोड.

गणेशोत्सवादरम्यान पुण्यात 3 दिवस ड्राय डे; पुणे पोलीस आयुक्तांची माहिती

( नक्की वाचा : गणेशोत्सवादरम्यान पुण्यात 3 दिवस ड्राय डे; पुणे पोलीस आयुक्तांची माहिती )

कोणत्या रस्त्यांवर वाहतुकीसाठी बंदी ?

लक्ष्मी रोड, शिवजी रोड, बाजीराव रोड, टिळक रोड, सिंहगड रोड, सणस रोड, केळकर रोड
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
महिलांनो, 'लाडक्या बहिणी'सह 3 सरकारी योजनांचा घ्या फायदा, घरबसल्या करा लाखोंची कमाई
पुणेकरांनो, गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीमध्ये मोठा बदल! बाहेर पडण्यापूर्वी हे वाचा
dombivli-ganesh-mandir-sansthan-centenary-ganeshotsav-full-information
Next Article
डोंबिवलीच्या मानाच्या गणपतीचे यंदा शताब्दी वर्ष, 'हा' देखावा पाहण्याची संधी चुकवू नका