
अमजद खान
डोंबिवलीतील हाय प्रोफाईल पलावा कॉम्प्लेक्समध्ये दोन लहान मुलांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. हॉलीबॉल खेळत असताना बॉल एका इमारतीत गेला. म्हणून त्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने दोन लहान मुलांचे हात बांधून त्यांना मारहाण केली. सध्या मानपाडा पोलिसांनी राजेंद्र खंदारे नावाच्या या सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
डोंबिवली नजीक असलेल्या हाय प्रोफाईल पलावा सिटीत कासा बेला गोल्ड सोसायटी आहे . बुधवारी संध्याकाळी त्याच सोसायटीतील लहान मुले सोसायटीच्या गार्डनमध्ये हॉली बॉल खेळत होती. खेळत असताना बॉल एका इमारतीत गेला. बॉल आणण्यासाठी मुले इमारतीत गेली. तुमच्यामुळे गाड्यांच्या नुकसान झाले आहे, असे सांगत इमारतीमधील सुरक्षा रक्षक राजेंद्र खंदारे यांनी या दोन मुलांना पकडले.
त्यानंतर त्यांचे हात बांधले. तो येवढ्यावरच थांबवा नाही. तर त्यांना हात बांधल्यानंतर त्यांना मारहाण देखील केली असा आरोप या मुलांनी केला आहे. यानंतर या दोघांपैकी एका मुलाचे पालक राजेंद्र खंदारेकडे गेले. त्याचा याबाबत जाब विचारला. मात्र खंदारे याने मुलांच्या पालकांसोबत पण मुजोरी केली. मी कोणाला घाबरत नाही, तुम्ही काय पण करा. त्याचे अरेरावी वाढत होती. त्याने केलेली चुक तो मान्य करायला तयार नव्हता.
नक्की वाचा - Ladki Bahin Yojana: E- KYC, OTP ची चिंता मिटणार, पण 'या' लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार
हे सर्व पाहाता या नंतर याची माहिती मुलांच्या पालकांनी सोसायटीचे चेअरमन योगेश पाटील यांना दिली. योगेश पाटील यांनी या घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना दिली. अमानुष कृत्य करणाऱ्या सुरक्षारक्षक राजेंद्र खंदारेला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो दारूच्या नशेत असल्याचा आरोप मुलाच्या पालकांनी केला आहे. मात्र या घटनामुळे एकच खळबळ उडाली आहे. पलावा कासा बेला गोल्ड या हाय प्रोफाईल सोसायटीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world