
अमजद खान
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर चाकू हल्ला झाल्याची घटना डोंबिवलीच्या नांदिवली परिसरात घडली आहे. पैशांच्या देवाण-घेवाणीवरुन शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि त्यांचा चालक यांच्यात भर रस्त्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की त्याचे रुपांतर रक्तरंजित राड्यात झाले. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. त्यात हा हल्ला चाकूने करण्यात आला. शिवाय तो शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावरच झाल्याने ही बातमी शहरात वाऱ्या सारखी पसरली. शिवाय हा हल्ला का झाला याचे कारण ही आता समोर आले आहे.
सुदाम जाधव हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहे. त्यांच्या गाडीवर मनोज नाटेकर हा चालक म्हणून काम करतो. डोंबिवली पूर्वेतील नांदिवली परिसरात भर रस्त्यात या दोघांमध्ये जोरदार राडा झाला. लक्ष्मीकांत बार समोर मनोज नाटेकर याने शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी सुदाम जाधव यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सुदाम हे जखमी झाले. त्यानंतर सुदाम यांनी प्रतिकार केला. त्यानंतर स्वत: ला सावरत मनोज नाटेकर याला सुदाम जाधव यांनी मारहाणीस सुरुवात केली.
मनोज नाटेकर याला सुदाम जाधव यांनी जबर मारहाण केली. मात्र त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी कोणी पुढे आले नाही. काही नागरीकांनी या घटनेची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली. पोलीस त्यानंतर घटनास्थळी दाखल झाले. सुदाम जाधव हे खाजगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. मनोज नाटेकर यांला मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी संपत फडोल यांनी ताब्यात घेतले आहे. हा सर्व राडा लोकां समोरच झाला. सर्व जण बघ्याची भूमीका घेत होते. त्यांना सोडवण्याचा कुणी प्रयत्न केला नाही. पोलीस आल्यानंतर हा सर्व प्रकार निवळला. पोलीसांना नाटेकर याला ताब्यात घेतले आहे.
नक्की वाचा - Viral video: ही अमेरिकन महिला म्हणते भारतात अजिबात जाऊ नका, कारण ऐकून धक्का बसेल
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज नाटेकर हा सुदाम जाधव यांचा चालक आहे. शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी सुदाम जाधव यांचा स्कूल व्हॅनचा व्यवसाय आहे. नाटेकर हा त्यांच्या स्कुलबसवर ड्रायव्हर होता. सुदाम यांनी त्याला तीन महिन्याचा पगार दिला नाही असा नाटेकर याचा आरोप आहे.या गोष्टीच्या रागातून मनोज याने सुदाम यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यानंतर सुदाम यांनी त्याला मारहाण केली. सध्या मनोज हा पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणात पोलीस काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world