जाहिरात

Dombivli News: रात्री लिफ्ट बंद ठेवण्याच्या वादातून सोसायटीत तुंबळ हाणामारी; डोंबिवलीतील VIDEO व्हायरल

Dombivli Crime News: डोंबिवलीत लिफ्टच्या वीजबिलावरून सोसायटीतील दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Dombivli News: रात्री लिफ्ट बंद ठेवण्याच्या वादातून सोसायटीत तुंबळ हाणामारी; डोंबिवलीतील VIDEO व्हायरल

वाढत्या वीजबिलाचा फटका सर्वसामान्यांना बसत असतानाच, आता याच वीजबिलावरून सोसायटीमध्ये थेट हाणामारी झाल्याची एक खळबळजनक घटना डोंबिवलीत घडली आहे. लिफ्टच्या वापरामुळे वीजबिल जास्त येत असल्याच्या कारणावरून शेजाऱ्यांनी एका रहिवाशाला बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.  याप्रकरणी डोंबिवलीतील टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका काय आहे विवाद?

डोंबिवलीतील शेलार नाका परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. संबंधित सोसायटीमध्ये लिफ्टच्या सततच्या वापरामुळे सामायिक वीजबिल जास्त येत असल्याचा आरोप काही रहिवाशांनी केला होता. यावर तोडगा म्हणून काही जणांनी रात्रीच्या वेळी लिफ्ट पूर्णपणे बंद ठेवण्याचा एकतर्फी निर्णय घेतला.

(नक्की वाचा-  Pune-Shirdi Railway: साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-शिर्डी पहिली थेट रेल्वे सेवा 17 जूनपासून सुरू)

सोसायटीतील एका रहिवाशाने रात्रीच्या वेळीही लिफ्ट सुरू ठेवण्याची मागणी केली. यावरून दोन्ही बाजूंच्या रहिवाशांमध्ये सुरुवातीला कडाक्याचे भांडण झाले. मात्र, हा वाद इतका विकोपाला गेला की संतप्त शेजाऱ्यांनी एकत्र येत त्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोसायटीच्या आवारात सुरू असलेल्या या राड्याचा व्हिडिओ तेथीलच काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. व्हिडिओमध्ये दोन्ही गट एकमेकांवर धावून जाताना आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत. 

(नक्की वाचा-  School Time: राज्यातील शाळांची वेळ बदलणार? ॲक्टिव्ह टीचर्स फोरमने शिक्षणमंत्र्यांकडे काय केली मागणी?)

दोन्ही गटांवर गुन्हे दाखल; पोलीस तपास सुरू

या राड्यानंतर दोन्ही बाजूंनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. टिळक नगर पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणत दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. सीसीटीव्ही आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे मारहाण करणाऱ्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, टिळक नगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com