Kalyan News: कल्याण-डोंबिवली आणि ठाणे परिसरातील एका मोठ्या विकासकाची मुजोरी आता थेट ज्येष्ठ नागरिकांच्या जीवावर उठल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आमदार निधीतून सर्वसामान्य जनतेसाठी बांधण्यात आलेल्या नदी घाटावर बिल्डरच्या कामगारांनी थेट दादागिरी करत जॉगिंगसाठी आलेल्या तब्बल 100 पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना चक्क आतमध्ये कोंडून ठेवले. या अत्यंत संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
काय आहे प्रकरण?
उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्या अधिकृत आमदार निधीतून उल्हास नदीच्या काठावर सर्वसामान्य नागरिकांच्या फिरण्यासाठी आणि बसण्यासाठी एक सुंदर घाट बांधण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी या परिसरातील जवळपास 100 हून अधिक ज्येष्ठ नागरिक तिथे मॉर्निंग वॉक आणि जॉगिंगसाठी गेले होते.
मात्र, त्याच वेळी तिथे असलेल्या रेजन्सी अँटिलिया या गृहप्रकल्पाच्या कामगारांनी अचानक दादागिरी सुरू केली. 'हा घाट आमचा आहे आणि यावर आमची मालकी आहे' असा दावा करत या कामगारांनी थेट घाटाच्या मुख्य प्रवेशद्वाराला मोठे टाळे ठोकले. यामुळे आतमध्ये असलेले सर्व वृद्ध नागरिक तिथेच अडकून पडले.
(नक्की वाचा : Kalyan News: एका खरेदीनंतर संपले सुखी कुटुंब... कल्याणमधील धक्कादायक हत्येचं कारण उघड )
ज्येष्ठ नागरिकांची घुसमट
बाहेर पडण्याचा मार्ग अचानक बंद झाल्यामुळे आणि प्रवेशद्वाराला टाळे लागल्यामुळे आतमध्ये अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये कमालीची भीती आणि घबराट पसरली. या वयात अचानक अशा प्रकारे कोंडून ठेवल्यामुळे अनेकांची घुसमट होऊ लागली. कामगारांना टाळे उघडण्याची वारंवार विनंती करूनही त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे काहीही ऐकले नाही.
हा सर्व प्रकार काही जागरूक नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले, जे काही वेळातच तुफान व्हायरल झाले.
( नक्की वाचा : Palghar News : डहाणू ते लंडन लव्ह जिहादचे भयंकर कनेक्शन! हिंदू मुलींना जाळ्यात ओढणाऱ्या नेटवर्कची Inside Story )
सामाजिक कार्यकर्त्यांनी तोडले टाळे
घाटावर ज्येष्ठ नागरिकांना डांबून ठेवल्याची माहिती मिळताच परिसरातील काही सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक तरुण तातडीने घटनास्थळी धावून आले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि अडकलेल्या वृद्धांची अवस्था पाहून स्वतः पुढाकार घेतला.
रेजन्सी ग्रुपच्या कामगारांच्या विरोधात घोषणाबाजी करत सामाजिक कार्यकर्त्यांनी लोखंडी टाळे तोडून काढले आणि आतमध्ये अडकलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांची सुखरूप सुटका केली. सुटका झाल्यानंतर या वृद्धांनी सुटकेचा श्वास घेतला, मात्र बिल्डरच्या या कृत्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती.
जनतेच्या पैशातून आणि लोकप्रतिनिधींच्या निधीतून उभारण्यात आलेल्या सार्वजनिक मालमत्तेवर खासगी बिल्डर आपली मालकी कशी काय सांगू शकतो, असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत. रेजन्सी ग्रुपच्या या मग्रुरीमुळे आणि बेकायदेशीर कृत्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. या प्रकरणी पोलीस आणि स्थानिक प्रशासन रेजन्सी ग्रुपच्या संबंधित मालक आणि कामगारांवर काय कायदेशीर कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लाग
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world