जाहिरात

Dombivli Local Derailment: डोंबिवलीत लोकल रुळावरून घसरली, वाहतुकीची सध्याची स्थिती काय?

Dombivli Station Local Derailment: मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकात आज एक मोठी दुर्घटना घडली आहे. अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकल ट्रेनचे तीन डबे रुळावरून घसरले आहेत.

Dombivli Local Derailment: डोंबिवलीत लोकल रुळावरून घसरली, वाहतुकीची सध्याची स्थिती काय?

Local Train Derail at Dombivli : मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकात आज एक मोठी दुर्घटना घडली आहे. अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकल ट्रेनचे तीन डबे रुळावरून घसरले आहेत. ही घटना घडली तेव्हा सुदैवाने लोकलमध्ये एकही प्रवासी नव्हता, त्यामुळे कोणतीही हानी झालेली नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही लोकल यार्डमधून अंबरनाथच्या दिशेने रवाना होत होती. डोंबिवली स्थानकाजवळ येत असताना अचानक लोकलचे तीन डबे रुळावरून खाली उतरले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांना काहीसा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक गाड्याच्या वाहतुकीवर देखील याचा परिणाम झाला आहे. 

(नक्की वाचा-  Bhendwal Bhakit: राज्यात पाऊस कसा असेल? राजकीय उलथापालथ होणार? भेंडवळच्या भाकितानं चिंता वाढली)

तीन डबे रुळावरून घसरले

डोंबिवली रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर शिवचंद्र आणि सदर लोकलचे गार्ड लोकेश मुदलियार यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली स्टेशन पास होताच लोकलच्या गार्ड डब्याकडील तीन डब्यांची चाके रुळावरून खाली उतरली आहेत. सुदैवाने ही लोकल 'एम्टी रॅक' असल्याने त्यामध्ये एकही प्रवासी नव्हता. त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब थोरात यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली  पीएसआय चव्हाण, एएसआय गवारी आणि पोलीस कर्मचारी बचाव कार्यात गुंतले आहेत. रुळ पूर्ववत करण्यासाठी तांत्रिक पथकाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

(नक्की वाचा-  Mumbai News: मुंबईत अंड्यावर येणार 'एक्सपायरी डेट'? खराब-सडलेली अंडी विकणाऱ्यांवर चाप बसणार)

प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2  बंद

सध्या सुरक्षिततेच्या कारणास्तव प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरील लोकल वाहतूक थांबवण्यात आली आहे. रुळावरून घसरलेले डबे पुन्हा रुळावर आणण्याचे आणि ट्रॅक दुरुस्त करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com