जाहिरात

का रे हा दुरावा? अमित शाह गडकरींच्या नागपुरात पण गडकरी मात्र काश्मीरात, कारण काय?

आगामी विधानसभा निवडणुकीतून गडकरींना बाजूला ठेवले जात आहे का? गडकरी आणि अमित शाह यांच्यात काही मतभेद आहेत का? यासारखे अनेक प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

का रे हा दुरावा? अमित शाह गडकरींच्या नागपुरात पण गडकरी मात्र काश्मीरात, कारण काय?
नागपूर:

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह हे नागपुरच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाह नागपुरात येत असताना मात्र नागपूरचे खासदार आणि मंत्री नितीन गडकरी मात्र नागपूरात नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह हे विदर्भातील मतदार संघांचा आढावा घेणार आहेत. इतक्या महत्वाच्या बैठकीला नितीन गडकरी हे अनुपस्थित राहाणार असल्याने मात्र सर्वांच्यात भूवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतून गडकरींना बाजूला ठेवले जात आहे का? गडकरी आणि अमित शाह यांच्यात काही मतभेद आहेत का? स्थानिक खासदार असतानाही गडकरी इतक्या महत्वाच्या बैठकीला नागपुरात का थांबले नाहीत हे आणि यासारखे अनेक प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.   

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विधानसभा निवडणुकीच्या तयारीला भाजप लागले आहे. बैठकांचा सपाटा  पक्षाच्या नेत्यांनी लावला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी विदर्भ महत्वाचा आहे. विदर्भ हा भाजपचा गड आहे. मात्र या गडात भाजपची पिछेहाट होताना दिसत आहे. ही बाब भाजपला परवडणारी नाही. त्यामुळे यामध्ये स्वत: अमित शाह यांनी लक्ष घातले आहे. ते विदर्भाची आढवा  बैठक घेत आहेत. त्यासाठी ते नागपुरात तळ ठोकून आहेत. अशा वेळी मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपुरात नाहीत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भ भाजपसाठी महत्वाचे आहे. त्याच बरोबर गडकरीही त्यात महत्वाची भूमीका बजावू शकतात. अशा वेळी गडकरी मात्र नागपूर ऐवजी काश्मीरमध्ये आहेत.

ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहिण योजनेचा तिसरा हफ्ता कधी जमा होणार? तारीख आली समोर

सध्या जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होत आहे. तिथे प्रचारही जोरात सुरू आहे. नितीन गडकरी हे ही काश्मीरमध्ये प्रचारासाठी गेला आहेत. त्यांचा हा पुर्वनियोजित दौरा असल्याचे सांगितले जात आहेत. त्यामुळेच नागपुरात होत असलेल्या बैठकीला ते अनुपस्थित राहाणार आहेत. असं असलं तरी काश्मीर पेक्षा महाराष्ट्राच्या निवडणुका या महत्वाच्या आहेत. शिवाय विदर्भात गडकरींना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा ही पक्षाला होवू शकतो. हे सर्व असतानाही गडकरी या बैठकीला नाही हे अनेकाना न पटणारे असल्याची चर्चा आहे. या मागे काही राजकीय समिकरणे आहेत का याचीही चर्चा सुरू झाली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - सरपंच-उपसरपंचांसाठी खुश खबर! मानधनात झाली घसघशीत वाढ, आता महिन्याला मिळणार...

गडकरी यांनी अलीकडच्या काळात काही वक्तव्य केली आहे. त्याचीही चर्चा सर्वत्र आहे. त्यांच्या वक्तव्याचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे असल्याचेही बोलले गेले. शिवाय आपल्याला विरोधकांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती असेही वक्तव्य गडकरी यांनी केले होते.  त्यामुळे गडकरींना जाणीवपूर्व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपासून दुर ठेवलं जात आहे का? याची ही चर्चा राजकीय वर्तूळात चांगलीच रंगली आहे. गडकरी यांचा दौरा पुर्वनियोजत जरी असला तरी इतक्या महत्वाच्या बैठकीसाठी ते तो दौरा रद्दही करू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही. अमित शाह नागपुरात असताना त्यांनी काश्मीरमध्ये जाणे पसंत केले. 

ट्रेंडिंग बातमी - Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर करणारे शिंदे कोण?

विदर्भात विधानसभेच्या जवळपास 62 जागा आहेत. विदर्भ हा एकेकाळी काँग्रेसचा गड होता. त्याला भाजपने खिंडार पाडले. 2014 च्या विधानसभा निवडणूकीत 62 पैकी जवळपास 44 जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत हा आकडा घसरला. भाजपला केवळ 29 जागा जिंकता आल्या. तर आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जोरदार दणका बसला आहे. त्यामुळे अमित शाह यांनी सर्व सुत्रे हाती घेतली आहेत. विदर्भात भाजपला दणका बसणे परवडणारे नाही. त्यामुळे ते दोन दिवस विदर्भाबाबत आढावा बैठक घेणार आहेत. शिवाय यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून नवा उत्साह निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.     

Switch To Dark/Light Mode
Previous Article
'लाडकी बहीण' योजना मतांसाठीचा जुगाड? भाजप आमदारानेच सांगितली खरी 'भानगड'
का रे हा दुरावा? अमित शाह गडकरींच्या नागपुरात पण गडकरी मात्र काश्मीरात, कारण काय?
Akshay Shinde encounter opponents angary what is reason understand in 7 points
Next Article
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर विरोधकांकडून संताप, पण कारण काय? 7 मुद्द्यांमधून समजून घेऊया