जाहिरात
This Article is From Sep 16, 2024

Walk : अतिरिक्त चरबी अन् आजारांना म्हणा बाय बाय, 30 दिवसांचा प्रभावी Walking Plan!

Walking Exercise : या गोष्टी फॉलो करीत असताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

Walk : अतिरिक्त चरबी अन् आजारांना म्हणा बाय बाय, 30 दिवसांचा प्रभावी Walking Plan!
मुंबई:

सातत्याने बदलत्या लाइफस्टाइलमुळे हेल्दी राहणं आव्हानात्मक झालं आहे. चालणं (Walking Exercise) हा असा व्यायाम आहे, जो केवळ शरीरालाच नाही तर मानसिक स्वास्थ चांगलं राहण्यासाठी फायदेशीर असतो. नियमित चालण्याच्या व्यायमामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळित राहतो आणि शरीरातील सर्व अवयवांना पुरेसं ऑक्सिजन मिळतं. याशिवाय चालण्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. जर तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर वॉकिंगचा 30 दिवसांचा प्लान फायदेशीर ठरेल. 

15 मिनिटांच्या चालण्याच्या प्लानने करा सुरुवात...
सुरुवातीच्या दिवसात दररोज 15 मिनिटं चालण्याचा सराव करा. तुम्ही सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेत चालायला जाऊ शकता. पहिल्या आठवड्यात फार गतीने चालणे टाळावे. 

प्रत्येक आठवड्यात 15 मिनिटांची वाढ करा...
दुसऱ्या आठवड्यात चालण्याच्या वेळेत वाढ करायला हवी. एका आठवड्यानंतर दररोज 30 मिनिटं चालण्याचा व्यायाम सुरू करा. यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह वाढतो आणि मानसिक स्वास्थ्य सुधारतं. 

तिसऱ्या आठवड्यात चालण्याच्या वेळेत आणखी 15 मिनिटांनी वाढ करा. म्हणजे तिसऱ्या आठवड्यात 45 मिनिटं चालायचा सराव करा. अशामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहायला मदत होईल. 

Weight Loss: वजन होईल पटापट कमी, पोटही होईल सपाट; नियमित केवळ करा हे एकच काम

नक्की वाचा - Weight Loss: वजन होईल पटापट कमी, पोटही होईल सपाट; नियमित केवळ करा हे एकच काम

चौथ्या आठवड्यात चालण्याच्या वेळेत आणखी 15 मिनिटांनी वाढ करीत दररोज एक तास चाला. 

या गोष्टींची काळजी घ्या...
या गोष्टी फॉलो करीत असताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. चालताना फार घाई-गडबड करू नका. चांगले शूज घाला. याशिवाय शरीराला हायड्रेट ठेवा. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: