जाहिरात

वजन कमी करण्यासाठी पोहे खावे की नाही? कॅलरी न वाढवता पोहे खाण्याची योग्य पद्धत कोणती? अनेकांना माहितच नाही

पोहा कसा खावा आणि कॅलरी न वाढवता पोहा खाण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? याबाबत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या क्लिनिकल न्यूट्रिशन विभागाच्या प्रमुख डॉ.करुणा चतुर्वेदी यांनी काय सांगितलंय, वाचा सविस्तर माहिती..

वजन कमी करण्यासाठी पोहे खावे की नाही? कॅलरी न वाढवता पोहे खाण्याची योग्य पद्धत कोणती? अनेकांना माहितच नाही
Poha For Weight Loss

Diet Plan For Weight Loss : पोहा ही एक अशी डीश आहे,जी भारतात नाश्त्यासाठी खूप लोकप्रिय आहे.पोहा वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येतो आणि आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानला जातो.पण जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हालाही एक प्रश्न नक्की पडला असेल. पोहे वजन कमी करण्यात खरंच मदतशीर आहेत का?की ते फक्त कार्बोहायड्रेटने भरलेला आहार आहे? तुम्ही पोहे कसे खाता आणि कशासोबत खाता? यावर याचं उत्तर अवलंबून आहे. वजन कमी करण्यासाठी पोहा कसा खावा आणि कॅलरी न वाढवता पोहा खाण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? याबाबत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या क्लिनिकल न्यूट्रिशन विभागाच्या प्रमुख डॉ.करुणा चतुर्वेदी यांनी हिंदूस्तान टाईम्सला मुलाखत दिलीय. 

पोहे का आहेत चांगला पर्याय?

डॉ.करुणा चतुर्वेदी यांच्या माहितीनुसार, पोहा हलका,सहज पचणारा नाश्ता आहे,जो योग्य पद्धतीने खाल्ल्यास वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतो. तसच पोह्यात खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे तुमचा आहार समाधानकारक होतो. 

पोह्यात काय आहे खास? 

पोहा मुख्यतः कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सपासून बनलेला असतो,जे हळूहळू ग्लुकोज रिलीज करतात आणि मधल्या वेळेत येणाऱ्या एनर्जी क्रॅशपासून वाचवतात.यात फॅटचे प्रमाण कमी असते आणि हे पोटावर हलके राहते, त्यामुळे फुगणे किंवा जडपणा जाणवत नाही.

फायबर आणि प्रोटीनचे महत्त्व

पोह्यात हलका फायबर असतो,पण जेव्हा तो भाज्या आणि नट्ससोबत बनवला जातो,तेव्हा फायबरचे प्रमाण वाढते. फायबर भूक नियंत्रित करण्यास आणि वजन व्यवस्थापनात मदत करते. न्यूट्रिशनिस्टच्या मते,पोहा बनवताना तेल कमी प्रमाणात वापरा. कोल्ड-प्रेस्ड किंवा व्हेजिटेबल ऑइल आणि त्यात मटार,गाजर,बीन्स, कांदा,टोमॅटो अशा भाज्या टाका. तसच थोडी मूगफली किंवा दही टाका..जेणेकरून प्रोटीनही मिळेल.

पोहा खाण्याचा योग्य वेळ

वजन कमी करण्यासाठी पोहा सकाळी नाश्त्यात खाणे सर्वात चांगला पर्याय आहे. यावेळी इन्सुलिन सेंसिटिव्हिटी जास्त असते,ज्यामुळे कार्बोहायड्रेट्स ऊर्जा मध्ये बदलतात,फॅटमध्ये नाही. सकाळी पोहा खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि अनहेल्दी स्नॅकिंगची शक्यता कमी होते.

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com