राहुल कुलकर्णी, पुणे
बीडमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीचा फटका पुण्यातील विद्यार्थ्यांना बसताना दिसत आहे. बीड आणि परळीतील पुण्यात शिकणाऱ्या विद्यर्थ्यांना पुण्यात अपमानस्पद वागणून मिळत असल्याच्या घटना समोर येत आहे. बीडमधील गुन्हेगारी घटनांमुळे विद्यार्थ्यांना पुण्यात मनस्ताप सहन करावा लागत आहे. एनडीटीव्ही मराठी काही विद्यार्थ्यांशी बातचित केली त्यावेळी काहींना अश्रून अनावर झाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेल्या बीड आणि परळी भागातील विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना काही ठिकाणी भाड्याचे फ्लॅट मिळत नाहीत, तर काही ठिकाणी आधीपासून राहत असलेल्या रुम खाली करण्याचा तगादा लावला जात आहे.
पाहा व्हिडीओ
(नक्की वाचा- Exclusive : "दाक्षिणात्य कर्मचाऱ्यांना प्राध्यान्य", Infosys कंपनीवर गंभीर आरोप करत IT इंजिनिअरचा राजीनामा)
"परळीत जन्म का घेतला असं वाटतंय"
पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या एका विद्याथ्याने त्यांचा अनुभव सांगितला. "वाचनालयात तो जाऊन बसला, त्यावेळी त्याच्या शेजारी बसलेल्या एका तरुणाने त्याचा जागा बदलली. मला वाईट वाटलं आणि मी त्याला विचारलं, जागा का बदलली. त्यावेळी तो म्हणाल की तुमच्या परळीबाबत असं म्हटलं जातं. तुमच्या समजाबाबत असं म्हटलं जातं. राजकारण कोणतंही करावं पण जातीचं, भावनेचं राजकारण करु नये. आज आम्हाला गुन्हेगार समजलं जातंय. आम्ही खचलोय, पण महाराष्ट्र शासन लक्ष देत नाही. परळीत आणि या समजात जन्म का घेतला अशी भावना आज माझी आहे. लोक आज आमची मजा घेत आहेत", असं या विद्यार्थ्यांने सांगितलं.
जातीय टोमणे आणि अपमान
विशेषतः वंजारी समाजातील विद्यार्थ्यांनी दावा केला आहे की, त्यांना जातीवरून टोमणे मारले जातात. “बीड-परळीचा आहेस का?” असे विचारून अवहेलना केली जाते.
(नक्की वाचा- घरी बसून बायकोला किती वेळ बघत बसणार ? 90 तास काम करा! L&T चेअरमन यांचा सल्ला)
वाचनालयात प्रवेश बंदी
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या या विद्यार्थ्यांना अनेकदा वाचनालयांमध्ये (लाईब्ररीत) बसण्यासही अडथळा आणला जातो. त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. या परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. पुण्यात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या बीड आणि परळीतील विद्यार्थ्यांची ही समस्या गंभीर असून याबाबत चौकशीची आवश्यकता आहे.