जाहिरात

पिता-पुत्राने रेल्वेखाली उडी घेत संपवलं जीवन; भाईंदरमधील मन सून्न करणारी घटना

Mumbai News : पिता-पुत्र वसईमधील रहिवाशी असल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.

पिता-पुत्राने रेल्वेखाली उडी घेत संपवलं जीवन; भाईंदरमधील मन सून्न करणारी घटना

मनोज सातवी, पालघर

भाईंदर रेल्वे स्थानकात पिता-पुत्राने लोकल ट्रेन खाली येऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली आहे. भाईंदर रेल्वे स्थानकाच्या प्लेटफॉर्म क्रमांक 6 वर ही घटना घडली आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हरिश मेहता (वय 60 वर्ष), जय मेहता (वय 35 वर्ष)  अशी आत्महत्या केलेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत. विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन खाली उडी मारुन दोघांनी आत्महत्या केली आहे. 

पिता-पुत्र वसईमधील रहिवाशी असल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. पिता-पुत्राने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. वसई जीआरपीने या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटनेचा तपास सुरू केला आहे. 

नक्की वाचा - मुंबईतील 8 रेल्वे स्टेशनची नावे बदलणार, विधानपरिषदेत ठराव मंजूर

पालघरमध्ये चिमुकलीची हत्या करुन महिलेची आत्महत्या

पती फिरायला घेऊन गेला नाही याचा राग मनात धरून एका महिलेने आपल्याच साडेचार महिन्याच्या चिमुकलीची गळा आवळून हत्या केली आहे. त्यानंतर स्वतःही गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे. पालघरच्या डहाणूतील सिसने येथील मनीषा जयेश राजड वय वर्ष 23 असे या निर्दयी मातेचे नाव आहे. या प्रकरणी मयत मनीषा विरोधात आपल्याच चिमुकल्या मुलीची हत्या केल्या प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मात्र या घटनेनंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.

(नक्की वाचा- BMW Hit And Run : शिवसेना नेत्याच्या मुलाभोवतालचा फास आवळला, बिलमधून मोठा खुलासा)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
AB Form : ‘एबी’ फॉर्म म्हणजे नक्की काय? उमेदवार इतका महत्त्वाचा का असतो हा फॉर्म?
पिता-पुत्राने रेल्वेखाली उडी घेत संपवलं जीवन; भाईंदरमधील मन सून्न करणारी घटना
bibek-debroy-resigns-gokhale-institute-of-politics-and-economics
Next Article
गोखले संस्थेचे कुलपती बिबेक देबरॉय यांचा राजीनामा