Mumbai Hit and Run : मुंबईतील साकीनाक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिट अँड रनच्या या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. साकीनाक्याच्या नाहर सोसायटीमध्ये दुबईवरून ईद निमित्त मुंबईत आलेला १७ वर्षीय मुलगा कार चालवीत होता. तो अर्टिका गाडी चालवित होता. भरधाव वेगात एर्टिगा गाडीने दुचाकी वरून जाणाऱ्या प्रतीक माने आणि त्याचा भाऊ सुमितला धडक दिली. यानंतर कारने पळ काढला.
या अपघातात प्रतीकचा जागीच मृत्यू झाला आहे. साकीनाका पोलिसांनी तत्काळ तपास करीत अल्पवयीन कार चालकाला घेतलं असून त्याच्या सोबत असलेल्या मोहम्मद खान याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन चालकाची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world