जाहिरात

पुण्यातील प्रवास होणार सुसाट?, रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांचे महापालिकेला निर्देश

येत्या काही दिवसांत शहरात एकही रस्त्यात खड्डा राहाता कामा नये, असा दमही मोहोळ यांनी महापालिका प्रशासनला भरला. त्यावर पुढील 4-5 दिवसांस खड्डे बुजवण्याची कार्यवाही करु, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले आहे.

पुण्यातील प्रवास होणार सुसाट?, रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांचे महापालिकेला निर्देश

राहुल कुलकर्णी, पुणे

पुणे महापालिका हद्दीत 15 वार्ड ऑफिस असून या प्रत्येक वॉर्ड ऑफिसला प्रत्येकी दोन अशा 30 टीम तयार करुन खड्डे बुजवणे आणि वाहतूक नियोजन करा, असे निर्देश केंद्रीय सहकार आणि हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिकेला दिले. महापालिक आणि पोलीस यांनी एकत्र काम करावे, असा सल्लाही मोहोळ यांनी पोलीस आणि महापालिका प्रशासनाला दिला. शिवाय येत्या काही दिवसांत शहरात एकही रस्त्यात खड्डा राहाता कामा नये, असा दमही मोहोळ यांनी महापालिका प्रशासनला भरला. त्यावर पुढील 4-5 दिवसांस खड्डे बुजवण्याची कार्यवाही करु, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पुणे शहरात गेली काही दिवस पावसाचा जोर कायम असून याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. शिवाय शहरात ठिकठिकाणी खड्डेही मोठ्या प्रमाणाच झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची एकत्रिक बैठक घेतली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मोहोळ यांनी म्हटलं की, पुणे शहरात एकूण 1400 किलोमीटरचे रस्ते असून खड्डे बुजवण्यात महापालिका कमी पडत आहे. प्रशासनाने यावर काम केलं पाहिजे. शिवाय वार्ड ऑफिसर रस्त्यावर असणे आवश्यक असून वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित झाले पाहिजेत. या दोन्ही विषयांसंदर्भात पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेणार असून लोकप्रतिनिधी म्हणून आमचे लक्ष आहे.

वाहतूक नियंत्रण करण्यासाठी महापालिकेचे सर्व वॉर्डन रस्त्यावर उतरावेत. शिवाय होम गार्डचे मनुष्यबळही पुरेपुर वापरून वाहतूक सुरुळीत करावी. शिवाय होम गार्डची उपलब्धता पुणे पोलिसांनी करुन द्यावी, अशीही सूचना मोहोळ यांनी बैठकीत केली. ठेकेदारांनी रस्त्यांची जबाबदारी घ्यायला हवी. पण जो कोणी घेत नसेल, त्यांच्यावर कारवाई करायला हवी. शिवाय कामात हयगय करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला पाठीशी घालू नका. आम्हाला पुण्यातील रस्ते आणि वाहतूक सुरुळीत झालेली पाहिजे, असेही निर्देश दिल्याचे मोहोळ म्हणाले. 

(नक्की वाचा - Pune-Nashik News : पुणे आणि नाशिकमध्ये कशी आहे स्थिती? दोन्ही जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट)

उद्धव ठाकरेंनाही टोला 

उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेची धुरा वर्षानुवर्षे सांभाळली असून त्यांनी आधी मुंबईतील रस्त्यांची परिस्थिती पाहावी. मुंबईपेक्षा पुणे खूप चांगलं आहे, असा टोला मोहोळ यांनी ठाकरे यांना लगावला.  पुरानंतर आम्ही सगळे फिल्डवर फिरलो होतो. शिवाय पाणी घरात घुसले तेव्हा आमची सर्व मंडळी मदतीस होती. भारतीय जनता पार्टीचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुराच्या पाण्यात होते. शिवाय औषध फवारणी, पाणी, स्वच्छता आणि विद्युत मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता बऱ्यापैकी लोकांचे जनजीवन सुरळीत झाले आहे, असंही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

(नक्की वाचा - त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण..., फडणवीसांचं ट्विट; महिनाभरानंतर सिद्धांतचा मृतदेह सापडला!)

राजाराम पुलाजवळी उड्डाणपूल लवकरच सेवेत

राजाराम उड्डाणपुलाजवळ सिंहगड रस्त्यावर साकारलेल्या उड्डाण पुलावर डांबरीचे आवरण व्हायचे राहिले असून पावसाने उघडीप घेतल्यास हे आवरण पूर्ण होईल. डांबरीचे आवरण न करता जर पूल वाहतुकीस सुरु केला तर मोठी अडचण होणार आहे. म्हणूनच ब्रीजच्या कामात राजकारण आणू नये, कारण पूल सुरु करण्यास प्रशासनाचा ग्रीन सिग्नल बाकी अद्यापही बाकी आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com