
Nashik News : जिंदाल कंपनीच्या नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील प्लांटला लागलेली आग 54 तासांनंतरही धुमसत आहे. नाशिक येथील जिंदाल पॉलीफिल्म्स या कंपनीच्या पीपी युनिट व पॉलीस्टर युनिटला 21 मे रोजी पहाटे 2 वाजता आग लागली होती. NDRF सह CBRN च्या टीमकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरी देखील आग नियंत्रणात येत नाही.
(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ठाणे, पुणे यासह इतर जिल्ह्यातूनही अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. कच्चे पेट्रोलियम पदार्थ असल्याने पाणी मारल्यास ऑक्सिजन आणि हायड्रोजन तयार होऊन आग अधिकच भडकत असल्याने अग्निशमन दलाला फोमचा मारा करावा लागत आहे.

Jindal Fire News
कंपनी परिसरातच असलेल्या प्रोपेन गॅस टाकीला आगीची झळ पोहचू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. त्याठिकाणी कूलिंग ऑपरेशन सुरूच आहे. धरणातील गाळयुक्त मातीचे प्रोपेन टाकीला आवरण देण्यात येऊन नवीन प्रयोग केला जात आहे. आग लागलेल्या ठिकाणापासून प्रॉपेन टँक 30 मीटर अंतरावर आहे.
औद्योगिक सुरक्षा संचालनालयाच्या माहितीनुसार घटनास्थळापासून सद्यस्थितीत 1 किमी परिसरातील भाग खबरदारीचा उपाय म्हणून रिकामा करण्यात आलेला आहे. मात्र आग कधी विझणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. कंपनीचे फायर ऑडिट झाले की नाही? किंवा इतर प्रकाराबाबत सर्व चौकशी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आश्वासन दिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world