प्रांजल कुलकर्णी, प्रतिनिधी
Ajit Pawar's supporter died of massive heart attack : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वयाच्या ६६ व्या वर्षी बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनाने राज्याला जबर धक्का बसला आहे. आज २९ जानेवारी रोजी त्याच्या अंत्यसंस्कारावेळी मोठा जनसागर लोटला होता. दादांचे कार्यकर्ते ओक्साबोक्क्षी रडत होते. 'दादा परत या, परत या'ची हाक दिली जात होती. आदल्या दिवसापर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बुडालेले दादा आज आपल्यात नाहीत ही भावना कोणलाच पचत नव्हती. दादांना काही झालं नाही, परत येतील अशी भावना व्यक्त केली जात होती. दादांची अकाली एक्झिट त्यांच्या कुटुंबासह कार्यकर्त्यांसाठी मोठा आघात आहे.
यादरम्यान आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अजित पवारांच्या समर्थकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावच्या 63 वर्षीय सुदाम बोडके यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या मृत्यूच्या बातमीमुळे ते अस्वस्थ झाले होते, अशी ग्रामस्थांकडून माहिती देण्यात आली आहे.
त्यातच ते नाशिकच्या दिशेने निघाले होते. दुचाकीवरून कामानिमित्ताने नाशिककडे जात असताना नाशिकच्या मार्केट यार्ड परिसरात पोहोचल्यावर त्यांना त्रास जाणवू लागला. उपचारासाठी ते स्वतः एका खाजगी दवाखान्यात गेले. मात्र दवाखान्यातच त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि ते कोसळले. येथेच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना आणि नातवंडं असा मोठा परिवार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world