
Pahalgam Terror Attack Update : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पहिल्यांदाच पर्यटकांना टार्गेट केलंय. पाकिस्ताननं पुरस्कृत केलेल्या दहशतवाद्यांचा या हल्ल्यात सहभाग आहे, ही बाब उघड झालीय. या हल्ल्यानंतर भारत सरकारनं आक्रमक होत पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केलीय. त्याचवेळी या हल्ल्यात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयसह (ISI) हमास (Hamas) ही दहशतवादी संघटनाही सहभागी असण्याची शक्यता आहे, असा दावा एनएसजी (NSG) आणि रॉ (RAW) या संघटनेतील निवृत्त अधिकारी दीपांज चक्रवर्ती यांनी 'NDTV मराठी' शी बोलताना व्यक्त केलाय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या प्रकारची दहशतवादी घटना घडल्यानंतर सुरक्षा एजन्सी काय विचार करतात? आता पुढं काय होईल? हा हल्ला त्या ठिकाणीच करण्याचे कारण काय होते या सर्व विषयावर त्यांनी सविस्तर भाष्य केले आहे.
स्थानिक पोलीस कुठं होते?
पहलगाममधील बैसरन घाटी या लोकप्रिय पर्यटन स्थळाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. हा हल्ला झाला त्या ठिकाणी सैन्य दल का नव्हतं? असा प्रश्न विचारणाऱ्यांना काश्मीरचे स्थानिक पोलीस कुठं गेले होते? हा पहिला प्रश्न मला विचारायचा आहे,असं चक्रवर्ती म्हणाले.
( नक्की वाचा : बंदुकीतून धाडधाड सुटणाऱ्या गोळ्या, चेहऱ्यावर मृत्यूची भीती! पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा भयंकर Video )
पहलगाममध्ये घुसून जाणीवपूर्वक सामान्य तसंच परदेशी पर्यटकांना टार्गेट करण्यात आलं आहे. काश्मीरचं निमित्त करत देशात धर्मवाद वाढवण्याचा दहशतवाद्यांचा अजेंडा स्पष्ट दिसत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
केंद्रीय तपास यंत्रणांना हल्ला होणार असल्याची कल्पना नसणे ही मोठी चूक असल्याचं त्यांनी मान्य केलं. काश्मीरमधील तरुणांमध्ये अस्वस्थता वाढवणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणणे हा मुख्य अजेंडा आहे. काश्मीरमधील पर्यटनाला याचा मोठा फटका बसणार आहे, असा इशारा चक्रवर्ती यांनी दिला.
सुरक्षा यंत्रणा कसा विचार करतात?
रॉ आणि आपल्या केंद्रीय इतर तपासणी यंत्रणा अशा घटनांनंतर नेमका कोणत्या स्वरूपात विचार करतात? या प्रश्नावर चक्रवर्ती यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की, ही घटना घडल्यानंतर सरकारला वेगवेगळे इनपूट दिले जातात. तसेच पुढील प्लॅन देखील दिला जातो. केंद्र सरकारला काय करायचं आहे? हा आता मुद्दा आहे. सद्यस्थितीच्या घटनेवरुन आगामी काळात भारत नक्कीच प्रत्युत्तर देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील मुस्लीम नागरिक देखील निषेध करत आहेत. त्यावरुन तेथील जनतेला विकास आणि स्वत:ची प्रगती महत्त्वाची वाटते हे स्पष्ट होते. काश्मीरमधील परिस्थीवरुन राज्य सरकार फार काही करेल असं दिसत नाही. त्यामुळे केंद्र सरकार तसंच राष्ट्रपतींनी आता काश्मीरमध्ये पुन्हा एकदा जास्त लक्ष देण्याची वेळ आली आहे, असंही चक्रवर्ती यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world