संजय तिवारी, नागपूर
नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील मोवाड येथे एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात सापडल्याने खळबळ उडाली. चौघांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. वृद्ध पती, पत्नी आणि दोन तरुण मुलांचे मृतदेह घरात आढळले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. विजय मधुकर पाचोरी (68 वर्ष), माला विजय पचोरी (55 वर्ष), गणेश विजय पचोरी (38 वर्ष) आणि दीपक विजय पचोरी (36 वर्ष) असं मृतांचा नावे आहेत.
(नक्की वाचा- गुंगीचं औषध देऊन शिक्षकाने विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार, अकोल्यातील धक्कादायक घटना)
पोलिसांना प्राथमिक तपासानुसार, तिघांची हत्या करून चौथ्याने फाशी घेतल्याचा संशय आहे. पोलिसांना तीन हत्या आणि एक आत्महत्या असल्याचा संशय आहे. घटनेतील तीन मृतदेह हात-पाय बांधलेल्या स्थितीत आढळून आला. तर चौथा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
(नक्की वाचा- जम्मू-काश्मीरमधील भाजप उमेदवाराचं निधन, 25 सप्टेंबरला झालं होतं मतदान)
दोन मुलांपैकी एकाने अन्य तिघांचे हातपाय बांधून त्यांना फाशी दिल्यानंतर स्वतः फाशी घेतली असावी असा पोलिसांना दाट संशय आहे. फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. त्यांच्याकडून परिसराचा कसून तपास सुरू आहे. नेमकी घटना कशी घडली आणि त्यामागे कारण काय आहे? याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world