
उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये एका 18 वर्षीय विद्यार्थीनीने JEE परीक्षेत अपयश आल्याने आयुष्य संपवलं. परीक्षेत अपयश आल्याने ती इतकी निराश झाली की तिने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेनंतर व्यथित झालेल्या अदाणी उद्योगसमूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी ट्वीट करुन मृत मुलीच्या कुटुंबियांचं सात्वंन केलं. विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून जाऊ नका, असा मोलाचा सल्लाही गौतम अदाणी यांनी यावेळी दिला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गौतम अदाणी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून एका हुशार मुलीचं असं जाणं हृदयद्रावक आहे. आयुष्य कोणत्याही परीक्षेपेक्षा मोठं असतं. ही गोष्ट पालकांना समजली पाहिजे आणि मुलांनाही त्यांनी समजावली पाहिजे. मी अभ्यासात साधारण होतो. परीक्षांमध्ये आणि जीवनात मी अनेकदा अपयशी झालो. मात्र प्रत्येकवेळी आयुष्यात नवीन रस्ता सापडला. माझी तुम्हा सर्वांना एवढीच विनंती आहे की अपयश हे अंतिम आहे, असं समजू नका. कारण आयुष्य नेहमी दुसरी संधी देते."
(नक्की वाचा- Crime news: 'सॉरी मम्मी,पापा, मी तुमचं स्वप्न...' भावनिक पत्र लिहीत 18 वर्षाच्या मुलीचे टोकाचे पाऊल, 'ती'ने असं का केलं?)
काय आहे घटना?
आदिती मिश्री ही इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी होती. 11 फेब्रुवारीला तिचा JEE चा निकाल आला होता. त्यानंतर 12 तारखेला तिने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या आई-वडिलांनी सुसाइड नोट लिहिली होती. परीक्षेत नापास झाल्यामुळे आदिती प्रचंड अस्वस्थ झाली होती. त्यातून तीने थेट आत्महत्या करण्याचा मार्ग स्वीकारला. तिच्या रूममध्ये ही सुसाइड नोट सापडली आहे. गेल्या दोन वर्षापासून आदिती JEE ची तयारी करत होती. त्यासाठी तिने गोरखपूर इथं कोचिंग क्लासही लावले होते. शिवाय ती हॉस्टेलवर राहत होती.
(नक्की वाचा- Rinku Rajguru: रिंकू होणार कोल्हापूरची सून? भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलासोबतच्या Photo ने चर्चा)
अदितीने सुसाईड नोट म्हटलं की, "सॉरी मम्मी-पापा, मला माफ करा. मी ही परीक्षा पास होऊ शकली नाही. हा आपल्या नात्याचा अंत आहे. तुम्ही कुणीही रडू नका. तुम्ही मला खूप प्रेम दिलं. मी तुमचं स्वप्न पूर्ण करू शकले नाही. छोटीची काळची घ्या. ती तुमचं स्वप्न नक्की पूर्ण करेल. तुमची लाडकी मुलगी आदिती."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world