जाहिरात

Crime news: 'सॉरी मम्मी,पापा, मी तुमचं स्वप्न...' भावनिक पत्र लिहीत 18 वर्षाच्या मुलीचे टोकाचे पाऊल, 'ती'ने असं का केलं?

आदिती मिश्री ही इंजिनिअरींगची विद्यार्थिनी होती. 11 फेब्रुवारीला तिचा JEE चा निकाल आला होता.

Crime news: 'सॉरी मम्मी,पापा, मी तुमचं स्वप्न...' भावनिक पत्र लिहीत 18 वर्षाच्या मुलीचे टोकाचे पाऊल, 'ती'ने असं का केलं?
गोरखपूर:

परिक्षेत अपयश आलं म्हणून अनेक विद्यार्थी खचून जातात. त्यातूनच ते टोकाचं पाऊलही उचलतात. अपयश ही यशाची पहिली पायरी असल्याचं बोललं जातं. मात्र हे आजकालच्या मुलांना पटत नाही. एकदा का नापास झालं की सर्व काही संपलं असचं त्यांना वाटत आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर इथं घडली आहे. इथं एका 18 वर्षाच्या मुलीनं फाशी घेत आत्महत्या (JEE Sudent Suicide) केली आहे. कारण काय तर  ती JEE च्या परिक्षेत नापास झाली. त्या आधी तीने लिहिलेल्या सुसाइड नोटनं तर आणखी खळबळ उडाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तीनं लिहीलेली सुसाइड नोट ही अतिशय भावनिक आहे. त्यात ती लिहीते सॉरी मम्मी पापा, मला माफ करा. मी ही परिक्षा पास होऊ शकली नाही. हा आपल्या नात्याचा अंत आहे. तुम्ही कुणीही रडू नका. तुम्ही मला खूप प्रेम दिलं. मी तुमचं स्वप्न पूर्ण करू शकले नाही. छोटीची काळची घ्या. ती तुमचे स्वप्न नक्की पूर्ण करेल. तुमची लाडकी मुलगी - आदिती अशा आशयाचं भावनिक पत्र तिने आत्महत्या करण्या पुर्वी लिहीलं आहे.  

ट्रेंडिंग बातमी - Ramdas Kadam:'ही तर उद्धव ठाकरेंच्या सणसणीत कानफाटात' साळवींच्या प्रवेशावरून कदमांचा टोला

आदिती मिश्री ही इंजिनिअरींगची विद्यार्थिनी होती. 11 फेब्रुवारीला तिचा JEE चा निकाल आला होता. त्यानंतर 12 तारखेला तिने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या आई वडिलांनी सुसाइड नोट लिहीली होती. परिक्षेत नापास झाल्यामुळे आदिती प्रचंड अस्वस्थ झाली होती. त्यातून तीने थेट आत्महत्या करण्याचा मार्ग स्विकारला. तीच्या रूममध्ये ही सुसाइड नोट सापडली आहे. गेल्या दोन वर्षापासून आदिती JEE ची तयारी करत होती. त्यासाठी तिने गोरखपूर इथं कोचिंग क्लासही लावले होते. शिवाय ती हॉस्टेलवर राहात होती. 

ट्रेंडिंग बातमी - Rinku Rajguru: 'रिंकू आणि मी ठरवूनच...','त्या' फोटोवरुन कृष्णराज महाडिक पहिल्यांदाच थेट बोलले

आत्महत्या करण्यापूर्वी आदितीने आपल्या आई वडीलांबरोबर फोनवर बोलली. त्यानंतर आपल्या वडीलांना मोबाईल रिचार्ज करायला ही सांगितला. त्या वेळी ती खूप नाराज होती असं सांगितलं जात आहे. ज्या वेळी ती घरच्यां बरोबर बोलत होती त्यावेळी तिच्या रुममध्ये कोणी नव्हते. तीचे रुममेट बाहेर गेले होते. ज्या वेळी तीच्या रुममेट हॉस्टेलच्या रुमवर आल्या त्यावेळी रुमचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी खिडकीतून पाहीले त्यावेळी आदिती पंख्याला लटकलेली त्यांना दिसली. 

ट्रेंडिंग बातमी - Aaditya Thackeray Delhi Tour : बुलाते है मगर जाने का नही! शिंदेचे स्नेहभोजन, ठाकरेंना ठसका

त्यांनी तातडीने हॉस्टेलच्या वॉर्डनला बोलवले. त्यांनी तातडीनो पोलीसांना पाचारण केले. आदिती मिश्री ही संत कबीरनगर जिल्ह्यातील मिश्रौलिया या गावची होती. या घटनेनंतर तिच्या घरच्यांना माहिती देण्यात आली. आदितीचं त्यानंतर शवविच्छेदन केले गेले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तिच्या मृत्यूचे खरे कारण समजेल असं पोलीस अधिक्षक अभिनव त्यागी यांनी स्पष्ट केले आहे.