घाटकोपरमधील छेडा नगर परिसरातील तब्बल 250 टन वजनाचं महाकाय जाहिराताचे होर्डिंग लगतच्या पेट्रोल पंपावर कोसळल्यामुळे 14 जणांचा हकनाक बळी गेला होता, त्यात आणखी वाढ झाली असून मृतांचा आकडा 16 वर गेला आहे. याशिवाय 75 जखमींपैकी 44 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. हे होर्डिंग अनधिकृत असल्याने याचा मालक भावेश भिंडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे सोमवारी होर्डिंग कोसळल्याने आतापर्यंत 16 जणांनी आपला जीव गमावला आहे.
याशिवाय या होर्डिंगजवळ आणखी तीन अनधिकृत होर्डिंग आहेत. महापालिकेकडून हे होर्डिंग हटवण्याचे काम सुरू आहे. लोहमार्ग पोलिसांकडे होर्डिंग हटवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचं त्यांनी सांगितल्यानंतर पालिकेने होर्डिंग हटवण्याची जबाबदारी घेतली.
नक्की वाचा - घाटकोपरमध्ये घडलेल्या या 5 घटनांनी महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हादरला
मृतांची नावे...
भरत वसंत राठोड (25)
चंद्रमणी खारपालू प्रजापती (45)
दिनेशकुमार जैस्वाल (44)
मोहम्मद अक्रम - (48)
बसीर अहमद अली हनीफ शेख - (60)
दिलीप कुमार पासवान - (30)
पुर्णेश बाळकृष्ण जाधव - (50)
सतीश बहादूर सिंग - (51)
फहीम खलील खान - (20)
सूरज महेश चव्हाण - (19)
धनेश मास्टर चव्हाण - (48)
हंसनाथ रामजी गुप्ता - (68)
सचिन राकेश कुमार यादव - (23)
राजकुमार दास - (20)
होर्डिंग मालक भावेश भिंडे विरोधात यापूर्वीही गुन्हे...
या होर्डिंगचा मालक आरोपी इगो मीडिया कंपनीचा संचालक भावेश प्रभूदास भिंडे (51) याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल झाल्याचं समोर आलं आहे. त्याच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल असून पालिकेच्या परवानगीशिवाय फलक लावल्याप्रकरणी 21 वेळा कारवाई करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world