जाहिरात

Silver And Gold Rate Today: चांदीच्या दराचा स्फोट, आजची किंमत पाहिली का ?

Silver And Gold Rate Today: आंतरराष्ट्रीय कारणांमुळे आणि मागणी-पुरवठ्यातील तफावतीमुळे ही दरवाढ होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Silver And Gold Rate Today: चांदीच्या दराचा स्फोट, आजची किंमत पाहिली का ?
मुंबई:

सोने आणि चांदीचे दर (Silver And Gold Rate Today) दररोज नवे विक्रम प्रस्थापित करू लागले आहे. खासकरून चांदीच्या भावात सातत्याने मोठी तेजी पाहायला मिळते आहे. आंतरराष्ट्रीय कारणांमुळे आणि मागणी-पुरवठ्यातील तफावतीमुळे ही दरवाढ होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. सोन्याच्या दरांबाबत बोलायचे झाल्यास नागपूर सराफा बाजारामध्ये 99.5 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची विक्री किंमत ही 1,56,800 इतकी होती. खरेदीसाठी हाच दर 1,52,100 रुपये इतका होता. प्लॅटीनमचा दर 10 ग्रॅमसाठी 80,000 रुपये इतका होता. तर खरेदीसाठी हाच दर 76,000 रुपये इतका होता.

नक्की वाचा: चांदी 10 लाख रुपयांचा टप्पा गाठणार? दरवाढीमागे तिसरं महायुद्ध भडकण्याची भीती?

चांदीचा आजचा दर काय आहे ? (Silver Rate Today In Mumbai)

नागपूर सराफा बाजारातून मिळालेल्या माहितीनुसार 20 जानेवारी रोजी चांदीचा विक्री दर हा 3,10,400 रुपये (बुलियन, भांडी आणि नाणी/बारसाठी) इतका होता. 21 जानेवारी हाच दर 3,26,100 रुपये इतका झाला आहे. 20 जानेवारी रोजी चांदीच्या दागिन्यांसाठीचा विक्री दर 3,07,300 रुपये इतका होता, जो 21 जानेवारी रोजी 3,22,900 रुपये इतका झाला आहे. 

चांदीचा 21 जानेवारी रोजीचा दर

चांदी विक्री दर 

3,26,100 : बुलियन, भांडी आणि नाणी/बारसाठी
3,22,900 : दागिन्यांसाठी

चांदी खरेदी दर

3,16,300 : बुलियन, भांडी आणि नाणी/बारसाठी
3,13,200: दागिन्यांसाठी

नक्की वाचा: मुंबईकरांसाठी महत्त्वाचं! 'या' 4 एक्स्प्रेस गाड्यांचे स्टेशन बदलणार; आता कुठून सुटणार? वाचा...

Sensex आणि Nifty मध्ये बुधवारीही मोठी घसरण

सलग दोन दिवस शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. बुधवारीही विक्रीचा जोर कायम राहिल्याने शेअर बाजारात मंदीचे वातावरण होते. मंगळवारी निफ्टी 353 अंकांनी तर सेन्सेक्स 1065 अंकांनी तुटला होता. सकाळी 11 वाजेच्या सुमारास सेन्सेक्स 800 अंकांनी तर निफ्टी अंदाजे 200 अंकांनी तुटला होता. सलग तिसऱ्या दिवशीही शेअर बाजार सावरण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीयेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com