जाहिरात

Nagpur News: 14 खेळाडूंना मिळाला ‘खासदार क्रीडा भूषण पुरस्कार’, रक्षा खडसे म्हणाल्या, " महाराष्ट्र आघाडीवर.."

नागपूर जिल्ह्यातील क्रीडा सुविधांसाठी जवळपास 45 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Nagpur News: 14 खेळाडूंना मिळाला ‘खासदार क्रीडा भूषण पुरस्कार’, रक्षा खडसे म्हणाल्या, " महाराष्ट्र आघाडीवर.."
Khasdar Krida Mahotsav 2026 Latest News

Raksha Khadse Nagpur Speech :"देशभरात एक उद्दिष्ट घेऊन क्रीडा क्षेत्रात काम सुरू आहे.2036 मध्ये भारतात ऑलिम्पिकचे आयोजन व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत व त्यासाठी मोठ्या प्रमाणात क्रीडा क्षेत्रातील संसाधने वाढविण्यावर भर दिला जात आहे",असं मोठं विधान केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केलं आहे."हा केवळ आठ दिवसाचा महोत्सव नसून क्रीडा क्षेत्रातील भविष्यासाठी ही स्पर्धा महत्वाची आहे.अनेक क्रीडा प्रकारात महाराष्ट्र आघाडीवर असून हे चित्र नक्कीच सुखावणारे आहे. देशांतर्गत विविध क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पहिल्या तीनमध्ये दिसून येतो,ही अभिमानाची बाब आहे.क्रीडा क्षेत्रात अनेक रोजगारांच्या संधीही उपलब्ध झालं आहे", असंही खडसे यांनी म्हटलं आहे.त्या नागपुरात आयोजित खासदार क्रीडा महोत्सवात बोलत होत्या. या क्रीडा महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. 

जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी 45 कोटींची तरतूद

नागपूर जिल्ह्यातील क्रीडा सुविधांसाठी जवळपास 45 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.खासदार क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी आयोजक समितीचे अभिनंदन केले. 

नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील 'या' रेल्वे मार्गावर 21 दिवसांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काही गाड्यांचे मार्ग बदलले

14 खेळाडूंना ‘खासदार क्रीडा भूषण पुरस्कार' प्रदान

विविध क्रीडा प्रकारांतील 14 खेळाडूंना ‘खासदार क्रीडा भूषण पुरस्कार तसेच विशेष पुरस्कार प्रदान मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.व्हॉलीबॉल:कर्मण्य  चिलकुलवार,अॅथलेटिक्स:अंजली मडावी,खो-खो:सिद्धेश सातपुते ,सॉफ्टबॉल:उर्वशी सनेश्वर,हँडबॉल :हरप्रीतसिंग रंधावा,कबड्डी :मंगला ढबाले ,स्केटिंग :अदिती धांडे,बुद्धिबळ :श्रद्धा बजाज, कुस्ती :नंदिनी साहू, बॅडमिंटन:निशिका गोखे,योगासन:भरत डेलिकर ,बास्केटबॉल:गुंजन मंत्री , जिम्नॅस्टिक:अवनी राठोड,जलतरण :अदित्री पयासी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

नक्की वाचा >> Trending News: राज्यभर FDA च्या 195 धाडी, 'त्या' विक्रेत्यांवर सर्वात मोठी कारवाई, 192 व्यक्तींना अटक

यंदा काही विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले.यात उत्कृष्ट संघटक पुरस्कार विजय डांगरे यांना तर उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार रवींद्र टोंग यांना तसेच क्रीडा सेवक पुरस्कार उमेश नायडू आणि उत्कृष्ट क्रीडा मंडळ म्हणून यंग मुस्लिम फुटबॉल क्लब यांना गौरविण्यात आले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com