देवा राखुंडे, प्रतिनिधी
Jejuri Fort News Today : पुण्यातील पुरंदरच्या जेजुरी गडावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे.गडावरील पालखी परिसरात काही व्यक्ती चप्पल घालून आल्याचे निदर्शनास आल्यानंतर तेथील एका पुजाऱ्याने संबंधीत व्यक्तींना रोखलं. "पालखी शेजारी चप्पल घालून का आलात?"असं पुजाऱ्याने त्यांना विचारलं.त्यानंतर दोन्ही गटात एकच वाद पेटला. तीन ते चार जणांनी संबंधित पुजाऱ्यास शिवीगाळ करत मारहाण केली.या घटनेमुळे गड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्याचे आवाहन
धार्मिक स्थळांवर परंपरा,नियम आणि श्रद्धेचे पालन करणे ही प्रत्येक भाविकाची जबाबदारी आहे. मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी सूचना करणाऱ्या पुजाऱ्यावरच हल्ला झाल्याच्या आरोपामुळे अनेक भाविक आणि स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.अशा पवित्र ठिकाणी वाद घालणे किंवा कायदा हातात घेणे योग्य नसल्याची भावना देखील व्यक्त होत आहे.