
GST Council : जीएसटी कौन्सिलने कर प्रणाली अधिक सोपी करण्यासाठी अनेक वस्तूंवरील जीएसटीचे दर कमी करण्याच्या तयारीत आहे. जीएसटी कौन्सिलने कर रचना अधिक सोपी करण्यासाठी अनेक वस्तूंना 5, 12, 18 आणि 28 टक्के या चार टप्प्यांमधून बाहेर काढून, त्यांची संख्या कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये काही सेवांनाही 5 टक्केच्या दरात आणण्याचा विचार सुरू आहे.
सध्या पार्लर, सलून आणि फिटनेस सेंटर्ससारख्या सेवांवर 18 टक्के जीएसटी लागू आहे, ज्यामुळे या सेवा सर्वसामान्यांसाठी महाग आहेत. मात्र, नवीन नियमांनुसार, या सेवांवरील कर 5 टक्केपर्यंत कमी झाल्यास, ग्राहकांना मोठा आर्थिक लाभ होईल.
(नक्की वाचा- Alcohol ban in Ganeshotsav: मुंबईत गणेशोत्सवादरम्यान दोन दिवस दारूबंदी, चेक करा तारखा)
पार्लर आणि सलूनमध्ये सध्या लागू असलेल्या 18 टक्के जीएसटीमुळे या सेवांसाठी मोठी रक्कम मोजावी लागते. जीएसटीचा दर 5 टक्के झाल्यास, ग्राहकांना त्यांच्या ब्युटी आणि पर्सनल केअर खर्चात मोठी बचत करता येईल. या बदलामुळे अनेक अत्यावश्यक वस्तू आणि सेवा स्वस्त होणार आहेत.
घरांच्या किंमती होणार कमी?
बांधकाम क्षेत्रातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या सिमेंटवरील जीएसटी दर 28% वरून 18% पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे. हा निर्णय बांधकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना मोठा दिलासा देईल. सिमेंटचे दर कमी झाल्यास घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, या कर कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचेल की नाही, याबद्दल काही चिंता व्यक्त केली जात आहे.
(नक्की वाचा- Mumbai Cyber Fraud: फेसबुकवर भेटल्या चारचौघी, आजोबांची रिकामी झाली तिजोरी; 9 कोटी गमावल्याने जडला स्मृतीभ्रंश)
दोन स्लॅबची संकल्पना
बहुतांश वस्तू आणि सेवा 5% आणि 18% या दोन मुख्य स्लॅबमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. तर तंबाखू आणि सिगारेटसारख्या काही वस्तू आणि लक्झरी वस्तूंवर 40% पर्यंत कर लावण्याचा विचार आहे. सर्व खाद्यपदार्थ आणि कपड्यांवरील वर्गीकरणाचा गोंधळ संपवून त्यांना सरसकट 5% जीएसटी स्लॅबमध्ये आणण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू स्वस्त होतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world