महायुतीत एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. मात्र शिंदे नाराज नसून त्यांचा तब्येत ठिक नसल्याचं महायुतीच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपत किंवा गृहमंत्रीपद यावर अडून बसले असल्याची माहिती देशील सूत्रांकडून मिळत आहे. मात्र शिंदेंच्या शिवसेनेला नेमकं काय हवंय याबाबत आमदार गुलाबराव पाटील यांनी भाष्य केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गुलाबराव पाटील यांनी म्हटलं की, "महायुतीत बिनसलं काहीच नाही. मुख्यमंत्री दोन दिवसांपासून आजारी होते. यातच गैरसमजाच वातावरण तयार करण्यात आलं होतं. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. सगळ्यांना अपेक्षा होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत. मात्र मुख्यमंत्रिपद नाहीतर आमची इच्छा आहे की त्यांनी उपमुख्यमंत्री पद घ्यावं. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहाता त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. मात्र गृहमंत्रिपद तरी एकनाथ शिंदेनी घ्यावं."
(नक्की वाचा- एकनाथ शिंदे विरोधी पक्षात बसणार? अंजली दमानिया यांच्या ट्वीटने चर्चांना उधाण)
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील. त्यामुळे सत्तेच्या बाहेर राहावं हे आम्हाला मान्य नाही. आमची इच्छा आहेच की एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं. केंद्राकडे आम्ही गृहमंत्री पदाची मागणी केली होती. पण जे केंद्र सांगेल ते आम्हाला मान्य असेल ही आमची भूमिका आहे, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.
( नक्की वाचा : महायुतीच्या नेत्यांना मंत्री होण्यासाठी द्यावी लागेल अमित शाहांची टेस्ट, वाचा काय असतील प्रश्न )
शिवसेना आणि भाजपची युती होती तेव्हा आम्ही मंत्रिपदाचा विचार कधी केला नाही. पण आम्ही हिंदुत्वसाठी एक राहिलो. एकनाथ शिंदे यांनी अजित पवार का आले असा प्रश्न कधीही विचारला नाही. कदाचित जर अजित पवार नसते तर आमच्या जागा जास्त आल्या असता, असा दावा देखील गुलाबराव पाटील यांनी केला.