डिजिटल युगात मैदानापासून दूर गेलेल्या मुलांना पुन्हा मैदानाकडे नेण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करणार आहे. त्यासाठी एक खास उपक्रमाची अंमलबजावणी करण्याची तयारी शिक्षण विभागाने सुरु केली आहे. मुलांना तणावातून मुक्त करण्यासाठीही याचा फायदा होणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'हॅपी सॅटर्डे' हा नवीन उपक्रम राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून आखला जात आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर या उपक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे. पुढील शालेय शिक्षण वर्षापासून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी देखील माहिती समोर येत आहे.
(नक्की वाचा- मुंबईचा वेगवान विकास आणि सुखी जीवनमानासंदर्भात सांगोपांग चर्चा, चर्चासत्रात महापालिका आयुक्तांचाही सहभाग)
हॅपी सॅटर्डे हा उपक्रम पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शनिवारी शाळेत वही, पुस्तक म्हणजे दप्तर आणावे लागणार नाही. या दिवशी विद्यार्थ्यांना शेती, क्रीडा, कला, तंत्रज्ञान, विज्ञान या विषयीच्या विविध उपक्रमांचे प्रात्यक्षिके शिकवण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना मैदानात नेलं जाईल.
( नक्की वाचा : पबमध्ये 48 हजार उडवले, मुलाच्या आजोबांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन; पुणे अपघात प्रकरणात धक्कादायक अपडेट )
विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी शासनाचा हा उपक्रम असणार आहे. सध्या विद्यार्थी आणि तरुण मोबाईलमध्ये गुंतले आहेत. यामधून विद्यार्थ्यांना बाहेर काढत मैदानाकडे नेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे या उपक्रमाची घोषणा कधी होते आणि त्याची अंमलबजावणी कशी होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world