जाहिरात

Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाचे थैमान; आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू, पिकांचेही मोठे नुकसान

Heavy rain in Marathwada : मुसळधार पावसामुळे 12.8 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाचे थैमान; आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू, पिकांचेही मोठे नुकसान

Marathwada Rain : मराठवाड्यात या वर्षी जोरदार पाऊस आणि पूर यामुळे मोठं नुकसान पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली आहे. 1 जूनपासून आतापर्यंत तब्बल 52 जणांचा मृत्यू झाला असून, दरवर्षीच्या सरासरी 25 ते 30 मृत्यूंपेक्षा हा आकडा खूप जास्त आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, या पावसामुळे 1,067 पशुधन मृत्युमुखी पडले असून, 2,000 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. यावर्षी नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये आलेल्या दोन पुरांमुळे मृतांची संख्या वाढली आहे. तसेच, मराठवाड्यातील एकूण 3,960 गावांना या पावसाचा फटका बसला आहे, ज्यामुळे 16 लाखांहून अधिक शेतकऱ्यांवर थेट परिणाम झाला आहे.

(नक्की वाचा-  Maharashtra Rain Update: पावसाचा ब्रेक संपला? 7 दिवस हवामान विभागाकडून राज्यातील 17 जिल्ह्यांना अलर्ट)

कोणत्या जिल्ह्यात किती मृत्यू?

  • नांदेड: 18 जणांचा मृत्यू
  • छत्रपती संभाजीनगर: 11 जणांचा मृत्यू
  • हिंगोली: 6 जणांचा मृत्यू
  • बीड: 6 जणांनी गमावला जीव
  • परभणी: 5 जणांचा मृत्यू
  • जालना आणि धाराशिव: प्रत्येकी 3 जणांचा मृत्यू

या मुसळधार पावसामुळे 12.8 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारकडून या नुकसानीची पाहणी केली जात असून, पीडितांना मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com