जाहिरात

Pune Rains: पुणे विभागात दमदार पाऊस; सरासरीपेक्षा 108 टक्के पावसाची नोंद

Pune rain Update : पुणे विभागाचे जून महिन्याचे सामान्य पर्जन्यमान 152.3 मिमी. असताना, प्रत्यक्षात 165.6 मिमी. पाऊस झाला आहे. म्हणजेच पुणे विभागामध्ये सरासरीच्या 108.7 टक्के पाऊस झाला आहे. 

Pune Rains: पुणे विभागात दमदार पाऊस; सरासरीपेक्षा 108 टक्के पावसाची नोंद

Pune Rain : पुणे विभागातील जिल्ह्यांमध्ये यंदा मान्सूनने दमदार सुरुवात केली.  23 जून 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, पुणे विभागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. ही आकडेवारी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असून अनेक जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे दिसून आलेले आहे. काही जिल्ह्यात पावसाने अद्याप सरासरी ओलांडली नसली तरी तिथली पावसाची स्थिती ही समाधानकारक आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पुणे विभागाचे जून महिन्याचे सामान्य पर्जन्यमान 152.3 मिमी. असताना, प्रत्यक्षात 165.6 मिमी. पाऊस झाला आहे. म्हणजेच पुणे विभागामध्ये सरासरीच्या 108.7 टक्के पाऊस झाला आहे. 

सरासरीपेक्षा जास्त पाऊस जिल्हे 

पुणे (146.8 टक्के), सातारा (126.3 टक्के), सांगली (124.2 टक्के) या जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात  सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सोलापूर (96.7 टक्के), कोल्हापूर (92.3 टक्के) या दोन जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.  

(नक्की वाचा-  PM Kisan 20th Installment Date: 20 वा हफ्ता जमा कधी येणार? जाणून घ्या EKYC ची प्रक्रिया)

गेल्या वर्षी याच काळातील पावसाच्या आकडेवारीशी तुलना करायची झाल्यास गेल्यावर्षी 23 जूनपर्यंत सरासरीच्या 180.8 मि.मी. पाऊस झाला होता. यावर्षी सरासरीच्या 117.0% पाऊस झाला आहे. पुणे विभागाबाबत बोलायचे झाल्यास जून ते सप्टेंबर या कालावधीतील एकूण सामान्य पर्जन्यमान 945.0 मि.मी. असते. पावसाचे दोन महिने अद्याप बाकी असून यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची दाट शक्यता आहे.

(नक्की वाचा-  Ujani Dam : उजनी धरण 76.27 टक्के क्षमतेने भरलं, भीमा नदी पात्रात विसर्ग वाढवला)

या जिल्ह्यामध्ये पावसाची तूट

वाशिममध्ये सर्वाधिक 86 टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. वाशिम नंतर अकोला - 77 टक्के, नागपूर - 74 टक्के, हिंगोली - 73 टक्के, भंडारा - 70 टक्के, गडचिरोली - 68 टक्के, बीड - 67 टक्के, जालना - 64 टक्के, गोंदिया - 62 टक्के, सोलापूर - 59 टक्के आणि परभणी - 58 टक्के या जिल्ह्यामध्ये पावसाची तूट आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com