जाहिरात

Pandharpur News: पंढरपूरमध्ये मुसळधार पाऊस, 'या' परिसरात चार वेळा पडली वीज, स्थानिकांमध्ये प्रचंड घबराट

 पंढरपूर शहर आणि तालुक्यात आज संध्याकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी विजांचा मोठा कडकडाटही झाला.तालुक्यातील कासेगाव ,खर्डी आदी परिसरात विजा पडल्याच्या घटना घडल्या.

Pandharpur News: पंढरपूरमध्ये मुसळधार पाऊस, 'या' परिसरात चार वेळा पडली वीज, स्थानिकांमध्ये प्रचंड घबराट
Pandharpur Rain And Lighting

संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी 

Pandharpur Rain Update : पंढरपूर शहर आणि तालुक्यात आज संध्याकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी विजांचा मोठा कडकडाटही झाला.तालुक्यातील कासेगाव ,खर्डी परिसरात विजा पडल्याच्या घटना घडल्या.खर्डी या एकाच गावात चार ठिकाणी वीज पडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,आज संध्याकाळी सात वाजल्यानंतर पंढरपुरात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

यामध्ये सुरुवातीला कासेगाव येथील नारळाच्या झाडावर वीज पडल्याची घटना घडली.त्यानंतर पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे एकाच दिवशी चार ठिकाणी वीज पडली.यामध्ये बनकर माळी वस्ती येथे उसात वीज पडून उसाने पेट घेतला.तर गावाशेजारील मुस्लिम कबरस्थान येथील मिरीच्या झाडाजवळ वीज पडून तेथील कडबा पेटला.

पंढरपूरातील शेतकरी चिंताग्रस्त

जळकेवाडी येथील नारळाच्या झाडावर एक ठिकणी तर बाळू जगताप यांच्या आंब्याच्या झाडावर वीज पडून झाड पूर्ण जळून खाक झाले आहे. सुदैवाने या चारही ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.मात्र,एका पाठोपाठ चार विजा पडल्याने बळीराजा हवालदील झाला आहे.महत्त्वाचे म्हणजे मागील आठवड्यातही खर्डी गावात वीज पडल्याची माहिती आहे.त्यामुळे सध्या विजांच्या कडकडाटामुळे व वीज पडून झाडांचे व शेतीचे होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

नक्की वाचा >> Dombivli News: प्रवाशाच्या कडेवर लहान मुल..100 रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न, एकही थांबली नाही, डोंबिवलीत संताप

डाळिंब फळबागांचंही झालं मोठं नुकसान

अनेक ठिकाणी खर्डी गावातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची लगबग आज रात्री नंतर सुरू केल्याची दिसून आले.मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट व वीज पडल्याच्या घटनांमुळे सर्वाधिक प्रमाणात डाळिंब फळबागांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. डाळिंब पिकाचे नुकसान या पावसामुळे होऊ शकते.याशिवाय इतर फळबागा व अनेक पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.

नक्की वाचा >>Pune News: पुण्यात मृत व्यक्तीच्या नावे कोट्यावधींची मालमत्ता हडपली, मास्टरमाईंडसह अख्खी टोळी खाणार जेलची हवा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com