रेवती हिंगवे, पुणे
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. बावधन बुद्रूक गावच्या परिसरातील डोंगराळ भागात सकाळी 6.45 वाजता घडली, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन पायलट आणि आणखी एकजण हेलकॉप्टरमधून प्रवास करत होते. ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे. दोन पायल आणि एका इंजिनियरचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
Maharashtra | Two people feared dead in a helicopter crash near Bavdhan in Pune district. Two ambulances and four fire tenders present at the spot.
— ANI (@ANI) October 2, 2024
(Pic Source: Pune Fire Department) https://t.co/3iuStSLkgL pic.twitter.com/mp09RSpP7m
हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी हिंजवडी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. माहिती मिळताच पोलीस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाचे जवान देखील घटनास्थळी दाखल झाले.
हेलिकॉप्टर कोणाचे होते हे अद्याप समजू शकलेले नाही, कारण ते आगीत जळून खाक झाले आहे, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र या अपघाताने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world