जाहिरात

Hindi Controversy: राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी देऊ नये, गुणरत्न सदावर्तेंची मागणी

हिंदी भाषा सक्ती झाली पाहिजे अशी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका आहे.  याआधी देखील राज ठाकरे यांच्या हिंदीविरोधी भूमिकेमुळे दोन गटात तेढ निर्माण होत असल्याचा आरोपी गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता.

Hindi Controversy: राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी देऊ नये, गुणरत्न सदावर्तेंची मागणी

Hindi Controversy:  हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. मराठी माणसांच्या हितासांठी आणि हिंदी भाषा सक्तीविरोधात राज ठाकरे यांनी 5 जुलै रोजी सर्वपक्षीय मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चात राज्यातील सर्व नागरिकांनी एकत्र यावे असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. याशिवाय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या मोर्चात एकत्र दिसतील अशी देखील दाट शक्यता आहे. 

मात्र राज ठाकरे यांचा हिंदी भाषा सक्तीविरोधात मोर्चा होईल की नाही याबाबत आता शंका उपस्थित होऊ लागली आहे. कारण राज ठाकरे यांच्या मोर्चाला परवानगी देऊ नये, या आशयाचे पत्र अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी शिक्षणमंत्री, पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त दिले आहे. 

हिंदी भाषा सक्ती झाली पाहिजे अशी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका आहे.  याआधी देखील राज ठाकरे यांच्या हिंदीविरोधी भूमिकेमुळे दोन गटात तेढ निर्माण होत असल्याचा आरोपी गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता. यासंदर्भात दादर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्या विरोधात तक्रार केली होती.

राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार

पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज ठाकरे यांनी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. हिंदीविरोधात राज ठाकरे- उद्धव ठाकरे यांचा एकच विराट मोर्चा निघेल असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. 5 जुलै रोजी राज ठाकरे यांचा मोर्चा निघणार आहे. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांचा 7 जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधातील आंदोलनात सहभगी होणार होते. अशातच आता हे दोन्ही मोर्चे एकाच दिवशी निघणार असल्याची मोठी घोषणा संजय राऊत यांनी केले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com