
सुजित आंबेकर, सातारा
साताऱ्यातील एका कॉन्व्हेन्ट शाळेत जाती भेद निर्माण केला जात असल्याचा आरोप करत शहरातील हिंदू संघटनांनी शाळेच्या गेट समोरच आंदोलन केले आहे. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांच्यावतीने सातारा शहरातील असलेल्या एका कॉन्व्हेंट हायस्कूलवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सातारा शहरातील ही इंग्रजी माध्यमाची शाळा मिशनरी हायस्कूल आहे. या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जातीय भावना निर्माण करून वेगळी वागणूक दिली जात असल्याचे आरोप विश्वहिंदू परिषद, बजरंग दल अशा हिंदूवादी संघटनांनी केले आहेत. आज या संघटनांनी शाळेसमोर आंदोलन करून माध्यमांच्या प्रतिनिधी समोर आपले म्हणणे मांडले.
नक्की वाचा : Exclusive : 'आमचं पारडं जड', 2024 च्या निवडणूक निकालाबाबत PM मोदींची NDTV ला खास मुलाखत
हिंदू, ख्रिश्चन, मुसलमान आणि इतर समाजातील विद्यार्थ्यांना वेगळी वागून दिली जात आहे. विद्यार्थींनींनी हातात बांगड्या घालायच्या नाही, कपाळाला कुंकू किंवा टिकली लावायचा नाही, समाजातील जातीक्रमाने वर्गात बसून शिक्षण दिले जाते, अशी वागणूक येथे विद्यार्थ्यांना दिली जात असल्याचं विश्वहिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. याबाबत शाळा व्यवस्थापनकडे विचारणा केली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
नक्की वाचा - हमालाला काम देण्यावरुन ट्रक चालकावर जीवघेणा हल्ला; डोंबिवलीतील घटना
शाळेच्या या कडक शिस्तीचा आणि विद्यार्थ्यांसोबतच्या भेदभावाची तक्रार आमच्यापर्यंत याआधीच आली होती. मात्र शाळेवर कारवाई करण्याचं काम शिक्षण अधिकाऱ्यांचं आहे. मात्र शिक्षण अधिकाऱ्यांचा या शाळेवर कसलाही वचक राहिलेला नाही. ही शाळा कुणालाही जुमानत नाही. मात्र आता उद्यापर्यंत या शाळेवर कारवाई न केल्यात आम्ही उद्या याठिकाणी आंदोलन करु, असा इशाराही हिंदू संघटनांनी दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world