जाहिरात

HMPV ची महाराष्ट्रात एन्ट्री, 'या' जिल्ह्यात आढळले 2 पॉझिटिव्ह रुग्ण; भारताची रुग्णसंख्या 8 वर

हा विषाणू फार धोकादायक नसल्याचं सांगितलं जात असलं तरी नागरिकांनी सावध राहणं आवश्यक आहे.

HMPV ची महाराष्ट्रात एन्ट्री, 'या' जिल्ह्यात आढळले 2 पॉझिटिव्ह रुग्ण; भारताची रुग्णसंख्या 8 वर

भारतातील HMPV ची रुग्णसंख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे. काल 6 जानेवारीपर्यंत बंगळुरूतून दोन, कलकत्त्यातून एक, गुजरातमधून एक तर चेन्नईतून दोन रुग्ण आढळले होते. आता महाराष्ट्रातही या नव्या व्हायरसने एन्ट्री घेतली आहे. नागपूर येथील मेडिट्रिना येथे दोन रुग्ण आढळल्याची माहिती आहे. या रुग्णांचे वय 7 आणि 14 वर्षे होते. दरम्यान आता त्यांची प्रकृती बरी असल्याचं सांगितलं जात आहे. आता देशात HMPV ची रुग्णसंख्या 8 वर पोहोचली आहे. आतापर्यंत आढळलेल्या सर्व रुग्ण हे कमी वयोगटातील आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हा विषाणू गेली कित्येक वर्षे भारतात आपल्या सभोवती असल्याने, हे विषाणू चीन किंवा अन्यत्र ठिकाणांहून येत असल्याचे म्हणता येणार नाही. 2001 मध्ये हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँड येथे आढळून आला. 

आतापर्यंत कुठे आढळले HMPV चे रुग्ण...
बंगळुरू - 2
कलकत्ता - 1
तामिळनाडू - 2
गुजरात - 1
महाराष्ट्र - 2

HMPV हा कोरोनासारखा धोकादायक आहे का? चीनमध्ये काय आहे स्थिती? डॉ. श्रीखंडेंना थेट विचारलं!

नक्की वाचा - HMPV हा कोरोनासारखा धोकादायक आहे का? चीनमध्ये काय आहे स्थिती? डॉ. श्रीखंडेंना थेट विचारलं!

हे करा...
    •   खोकल्याच्या वेळी तोंड-नाक झाकावे.
    •   नियमितपणे हात धुवा.
    •   ताप-खोकला असल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा.
    •   पोषणयुक्त आहार घ्या.
    •   घरातील हवा खेळती ठेवा.

हे करू नये...
    •    हस्तांदोलन.
    •    टिश्यू/रुमालाचा पुनर्वापर.
    •    आजारी लोकांशी संपर्क.
    •    डोळे-नाक-तोंड वारंवार स्पर्श करणे.
    •    सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.
    •    डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणे.

MPV ची लागण कोणाला होते?
- लहान बालकं
- वृद्ध
- रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांना

HMPVची लक्षणं...
सर्दी आणि खोकला
घशाला खवखव
ताप येणे
श्वास घेण्यास अडथळा
ब्रोंकियोलाइटिस 
न्यूमोनियासारखे गंभीर श्वसनाचे आजार

HMPVचा कुणाला सर्वाधिक धोका
लहान मुलं (5 वर्षांखालील)
वृद्ध
रोगप्रतिकारशक्ती कमी असणारे
अस्थमा किंवा सीओपीडी
श्वसनासंबंधित आजाराशी सामना करणारे रुग्ण

HMPVचं निदान कसं कराल?
छातीचा एक्सरे
RTPCR
रॅपिड एन्टीजन टेस्ट (Rapid antigen test)

कसा कराल बचाव?
नियमितपणे हात धुणे
गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा
खोकताना आणि शिंकताना मास्क वापरा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com