जाहिरात

HSRP number plate deadline: HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी पुन्हा मुदतवाढ, यापुढे संधी नाही ?

HSRP number plate deadline: HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी पुन्हा मुदतवाढ, यापुढे संधी नाही ?
मुंबई:

HSRP number plate news deadline: वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावण्याची अंतिम मुदत आता पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे.(HSRP number plate deadline)  वाहनधारकांना मोठा दिलासा देत, परिवहन विभागाने ही मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (August 15 2025 HSRP deadline) यापूर्वी एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यासाठी 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली होती. 20 जून रोजी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी एक पत्रक काढत HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठीची मुदत 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.  

(नक्की वाचा : जुन्या वाहनांना HSRP प्लेट लावण्यासाठी महाराष्ट्रासह 20 राज्यांमध्ये दर निश्चित )

HSRP नंबरप्लेट बसविण्यात अडचणी

गेल्या काही महिन्यांपासून HSRP नंबर प्लेट्स बसवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अपेक्षेप्रमाणे वेग आलेला नव्हता. कोट्यवधी वाहनांसाठी नंबर प्लेट्सची उपलब्धता, ऑनलाइन बुकिंगमधील तांत्रिक अडचणी, फिटमेंट सेंटरवरील गर्दी आणि ग्रामीण भागातील वाहनधारकांची गैरसोय ही प्रमुख कारणे या मुदतवाढीमागे असल्याचे बोलले जात आहे.

अनेक ठिकाणी नंबर प्लेट्स मिळायला विलंब होत होता, तर काहींना ऑनलाइन अर्ज करण्यात अडचणी येत होत्या. या सर्व बाबी लक्षात घेऊन यापूर्वी सरकारने HSRP नंबरप्लेट बसविण्यासाठीची मुदत वाढवली होती.  अजूनही अनेक वाहनांना ही नंबरप्लेट बसवण्यात आलेली नाहीये. या वाहनांना ही नंबरप्लेट बसविता यावी यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येत असल्याचे परिवहन आयुक्तांनी म्हटले आहे. 

(नक्की वाचा: सावधान! HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी करायला जाल आणि डोक्याला हात मारुन घ्याल)

HSRP नंबरप्लेटसाठी नोंदणी कशी कराल? (How to apply for HSRP number plate?)

1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या गाड्यांना HSRP नंबरप्लेट बसवणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. (Is HSRP number plate mandatory?) HSRP सक्ती लागू करण्यात आल्यापासून ही नंबरप्लेट बसविण्यासाठी दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. पहिले ही मुदत 30 जून 2025 करण्यात आली होती, त्यानंतर ती 30 एप्रिल 2025 करण्यात आली होती. आता ही मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या मुदतवाढीमुळे ज्या वाहनधारकांनी अद्याप आपल्या वाहनांवर HSRP नंबर प्लेट्स बसवून घेतल्या नाहीत, त्यांना पुरेसा वेळ मिळेल असं परिवहन विभागाचे म्हणणे आहे. नागरिकांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता, लवकरात लवकर नजीकच्या अधिकृत फिटमेंट सेंटरवर संपर्क साधावा किंवा संबंधित वेबसाइटवर ऑनलाइन बुकिंग करावी, असे आवाहन परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे.  

(नक्की वाचा : हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य का आहे? फायदे समजून घ्या)

अंतिम मुदतवाढ ?

परिवहन आयुक्तांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये  HSRP नंबरप्लेटसाठी देण्यात आलेली मुदत 15 ऑगस्टपर्यंत वाढवत असल्याचे सांगत असतानाच ही अंतिम मुदतवाढ असल्याचे म्हटले आहे. 15 ऑगस्टपर्यंत ही नंबरप्लेट बसवली नाही तर वायु वेग पथकाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आयुक्तांनी म्हटले आहे. ज्या वाहनचालकांनी या नंबरप्लेटसाठी 15 ऑगस्टपूर्वी बुकींग केले आहे आणि  ज्यांना 15 ऑगस्टनंतरची अपॉईंटमेंट मिळाली आहे अशा वाहनांवर कारवाई केली जाणार नाही असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com