जाहिरात

सावधान! HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी करायला जाल आणि डोक्याला हात मारुन घ्याल

HSRP Fraud : लोकांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी सहा बनावट वेबसाइट्स तयार केल्या आहेत. सहायक वाहतूक आयुक्त गजानन ठोंबरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सावधान! HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी करायला जाल आणि डोक्याला हात मारुन घ्याल

देशभरातील वाहनांना हाय सिक्युरिटी रेजिस्ट्रेशन प्लेट्स (HSRP) बसवाव्या लागणार आहेत.  1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहने असलेल्या रहिवाशांना 30 एप्रिलपूर्वी या नंबर प्लेट्स बसवाव्या लागणार आहेत. अनेक नागरिक ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करत आहेत. मात्र सायबर गुन्हेगारांनी यात संधी शोधत नागरिकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. लोकांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी सहा बनावट वेबसाइट्स तयार केल्या आहेत. सहायक वाहतूक आयुक्त गजानन ठोंबरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन अधिकृत एचएसआरपी कंत्राटदारांपैकी दोघांनी वाहतूक विभागाला माहिती दिली की किमान सहा बनावट वेबसाइट त्यांच्या सेवांचे बनावटीकरण करत आहेत. यातून वाहन मालकांची फसवणूक होत आहे.बनावट लिंक्स दिसल्यानंतर वाहतूक विभागाने ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधला. लोकांना खऱ्या लिंक्स आणि बनावट लिंक्समध्ये फरक समजला नाही.

(नक्की वाचा-  Why HSRPs mandatory : हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य का आहे? फायदे समजून घ्या)

या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंतिम मुदत जवळ येत असल्याने नागरिक नंबर प्लेट बदलण्यासाठी घाई करत आहेत. याचा फायदा घेऊन लोकांना फसवण्यासाठी अशा बनावट लिंक्स किंवा वेबसाइट तयार केल्या आहेत. या प्रकरणी कलम 318 (3) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 सी आणि 66 डी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, असं पोलिसांनी सांगितले.

(नक्की वाचा- - वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी किती खर्च येणार? वाचा दर)

वाहतूक आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितलं की अशा बनावट वेबसाइट्सबद्दल अनेक तक्रारी आल्या आहेत. आम्ही अशा सहा वेबसाइट्स ओळखल्या आहेत. जनतेची फसवणूक टाळण्यासाठी वाहतूक विभागाकडून जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे, असंही भिमनवार यांनी सांगितलं. 

(नक्की वाचा-  वाहनांना HSRP नंबर प्लेट कधीपर्यंत बसवता येणार? मुदतवाढीबाबत परिवहन आयुक्तांचं मोठं वक्तव्य)

HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत कधीपर्यंत?

HSRP नंबर प्लेट लावण्याचं काम सुरू झालं आहे. याची मुदत 30 एप्रिलपर्यंत आहे. केंद्रीय मोटार नियम 1989 च्या नियमानुसार सर्व वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' लावणं बंधनकारक आहे. ज्यांनी 1 एप्रिल 2019 नंतर गाड्या खरेदी केल्या आहेत अशा गाड्यांना HSRP नंबर प्लेट आहेत. मात्र त्या आधीच्या गाड्यांना या नंबर प्लेट नाहीत. राज्य परिवहन विभागाच्या वेबसाइटवर (https://transport.maharashtra.gov.in) लॉग इन करून नोंदणी करावी लागेल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: