जाहिरात

IAS Shivansh Jagade : "UPSC पास झालो, पण आदल्या दिवशी 600 रुपये गेल्याचं दुःख"

IAS Shivansh Jagade Interview : कोरोना काळात यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केल्यानंतर सेल्फ स्टडीवर भर देत शिवांशने हे यश संपादित केलं आहे.

IAS Shivansh Jagade : "UPSC पास झालो, पण  आदल्या दिवशी 600 रुपये गेल्याचं दुःख"

IAS Shivansh Jagade : पुण्याच्या शिवांश जागडे याने वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेत यश मिळवलं आहे. शिवांशने देशात 26 क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे शिवांश IAS बनण्याची दाट शक्यता आहे. एनडीटीव्ही मराठीने शिवाशं जागडेशी संवाद साधत त्याने हे यूपीएससीचं गणित कसं सोडवलं याची माहिती घेतली. यावेळी शिवांशने यूपीएससी परीक्षेत पास होऊन IAS बनल्याचा आनंद आहे, पण 600 रुपये गेल्याचं दु:ख आहे, असं सांगितलं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शिवांश जागडे यांने आपल्या रिझल्टविषयी सांगताना म्हटलं की, रिझल्ट कोणत्या तारखेला लागेल याचा अंदाज होता. मात्र निकाल काय लागेल याची मला काहीच कल्पना नव्हती. 22 एप्रिल रोजी यूपीएससी परीक्षेचा निकाल होता आणि 21 एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे मी 600 रुपये भरून एमपीएससीचा फॉर्म भरला. पण यूपीएससीच्या निकालानंतर माझे 600 रुपये वाया गेले. मात्र 22 तारखेला यूपीएससीचा निकाल लागल्यानंतर खूपच आनंद झाला. 

शिवांश मुळचा पुण्यातील पानशेत जवळील रुळे गावचा आहे. शिवांशचं शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून झालं असून तो गणित विषयात बीएससी पदवीधर आहे. 2023 मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर त्याने यूपीएससीसाठी परीक्षा देण्याची जोमाने तयारी केली. यूपीएससी परीक्षेतही पर्यायी विषय  म्हणून त्याने गणित हाच विषय निवडला.

(नक्की वाचा-  UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंद क्षणात विरला, निकालाच्या पाचव्या दिवशी मोहिनीवर दु:खाचा डोंगर)

यूपीएससीचा अभ्यास करताने त्याने कोणताही क्लास लावला नव्हता हे विशेष आहे. कोरोना काळात यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केल्यानंतर सेल्फ स्टडीवर भर देत शिवांशने हे यश संपादित केलं.  युट्यूबवर, टेलिग्रामवर व्हिडीओ आणि अभ्यासासाठी पुरेसं मटेरियल उपलब्ध असल्याने क्लास लावण्याची गरज लागली नाही, असंही शिवांशने सांगितलं. शिवांशने आपल्या मुलाखतीत त्यांच्या कुटुंबीयांचा खडतर प्रवास, त्याची मेहनत आणि अधिकारी बनल्यानंतर काय करायचंय, यावर सविस्तर भाष्य केलं आहे. 

पाहा संपूर्ण मुलाखत

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: