Imtiaz Jaleel News: "जिथे खड्डे खोदले तिथेच पुरून टाकेन", वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याला इम्जियाज जलील यांची धमकी

Chhatrapati Sambhajinagar News : शहरातील आमखास मैदानावर फुटबॉल स्टेडियमच्या जागेबाबत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी मान्यता दिली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhatrapati Sambhajinagar News : वक्फ बोर्डाच्या कार्यालयात घुसून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना नागडे करून मैदानावर घेऊन जाण्याची धमकी देखील इम्तियाज जलील यांनी दिली. वक्फ मंडळाच्या मालकीच्या आमखास मैदानावर अल्पसंख्याक आयुक्तालय, मौलाना आझाद आर्थिक विकास तसेच वक्फ मंडळाचे कार्यालय अशी तीन कार्यालये आहेत. 

(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याठिकाणी बांधकामासाठी सुरू असलेले खोदकाम माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखालील एमआयएमच्या शिष्टमंडळाने बुधवारी बंद पाडले. तसेच वक्फ बोर्डाच्या कार्यालयात घुसून इम्तियाज जलील यांनी अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या. वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना नागडे करून मैदानावर घेऊन जाऊ, जिथे अधिकाऱ्याने खड्डे खोदले तिथेच तुला पुरून टाकेल अशी वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याला जलील यांनी धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Advertisement

(नक्की वाचा -  ATM Withdrawal : एटीएममधून पैसे काढणे महागले; 1 मे पासून नवा नियम लागू)

काय आहे प्रकरण?

शहरातील आमखास मैदानावर फुटबॉल स्टेडियमच्या जागेबाबत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी मान्यता दिली होती. वक्फ बोर्डाने स्टेडियमसाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले होते. आता मात्र, त्याच जागेवर तीन कार्यालय बांधण्यासाठी खड्डे खोदणे, जमिनीचे सपाटीकरण असे काम सुरु करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील तीन कंत्राटदारांना तीन कार्यालय बांधण्याचे कंत्राट दिल्याची माहिती मिळाल्यानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह MIM च्या कार्यकर्त्यांनी मैदानावर धाव घेत बांधकाम रोखले. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी वक्फ बोर्डात जात अधिकाऱ्यांना जाब विचारला.

Advertisement

(नक्की वाचा- MHADA Offer : म्हाडाची 'बुक माय होम' भन्नाट ऑफर, नागरिकांना आवडेल ते घर खरेदीची संधी)

वक्फ बोर्डाची भूमिका

वक्फ बोर्डचे अध्यक्ष समीर काझी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमखास मैदानावर कार्यालय बांधकाम सुरू होते. याबाबत तत्कालीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी निर्णय घेतला होता. याबाबत निविदा प्रकाशित झाल्या काम सुरू झाले. तिथे 11 एकरवर फुटबॉल स्टेडियम होणार आहे. पण आमचं कार्यालय ते 11 एकर सोडून असलेल्या जागेवर होणार आहे. सत्यता न तपासात जलील यांनी आमच्या कार्यालयात येऊन खराब भाषेत वक्तव्य केले. माजी खासदार आहेत त्यांना हे सगळं काम कसे होते माहिती असायला हवी. आमचं कार्यालय अत्यंत छोट्या जागेत आहेत, काम करता येत नाही. इम्तियाज जलील 3 वर्ष बोर्डाचे सदस्य होते, पण त्यांनी काहीच केलं नाही. आम्ही प्रयत्न करतोय, हे विकासकाम आहे, याला विरोध कशाला असा प्रश्न काझी यांनी उपस्थित केला.
 

Advertisement